
मुंबई – गोवा दरम्यान कार ट्रान्सपोर्टसाठी आता ‘रो-रो सेवा’
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी एक दिलासाद बातमी! कोकण रेल्वे महामंडळाने (Konkan Railway Corporation Limited) कोलाड (महाराष्ट्र) ते वेरणा (गोवा) दरम्यान खासगी कार्सच्या वाहतुकीसाठी ‘Ro-RO’ (Roll-on Roll-off) सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
🗓️ सेवा कधीपासून?
ही सेवा 23 ऑगस्ट 2025 पासून 10 सप्टेंबर 2025 पर्यंत चालणार आहे. कोलाडहून वेरणा आणि वेरणाहून कोलाड असा दररोज एक ट्रिप असेल.
कोलाडहून प्रस्थान – सायंकाळी 5 वाजता
वेरणामध्ये आगमन – दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता
प्रवाशांनी 3 तास आधी म्हणजे दुपारी 2 वाजेपर्यंत स्टेशनवर हजर राहणे आवश्यक आहे.
💰 शुल्क किती?
प्रत्येक कारसाठी भाडे: ₹7875/- (5% GST सह)
नोंदणी शुल्क: ₹4000/- आगोदर भरावे लागेल, उर्वरित ₹3875/- प्रवासाच्या दिवशी भरावे लागेल.
👥 एक कार – तीन प्रवासी!
प्रत्येक कारसोबत जास्तीत जास्त 3 प्रवासी प्रवास करू शकतात –
2 प्रवासी – 3AC डब्यात (₹935/- प्रति प्रवासी)
1 प्रवासी – SLR डब्यात (₹190/- प्रति प्रवासी)
📑 आवश्यक कागदपत्रे:
नोंदणी करताना खालील कागदपत्रांची झेरॉक्स आवश्यक आहे –
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- RC बुक
- कारचे वैध इन्शुरन्स ❗ महत्त्वाच्या सूचना: प्रवासादरम्यान कोणीही कारमध्ये बसू शकणार नाही.
गाडीमध्ये ज्वलनशील किंवा बेकायदेशीर वस्तू ठेवण्यास मनाई आहे.
गाड्यांची लोडिंग/अनलोडिंग जबाबदारी ग्राहकाची असेल (रेल्वेकडून मदत केली जाईल).
सेवा रद्द झाल्यास (जर 16 पेक्षा कमी बुकिंग असेल), नोंदणी शुल्क परत केले जाईल.
मात्र, ग्राहकाने प्रवासाला हजर न राहिल्यास नोंदणी शुल्क जप्त होईल.
🚀 फायदे:
प्रवासाचा वेळ अर्धा होतो – रोडने 22 तास लागतात, ट्रेनने फक्त 12 तासात गोवा!
प्रवासात दमणूक टळते आणि गाडीला अतिरिक्त कष्ट नाहीत.
गणपतीच्या काळात कोकणात वाहनांची मोठी गर्दी असते, अशा वेळी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
तर मग तयार आहात का आपल्या कारसोबत जलद आणि आरामदायक प्रवासासाठी?





Be First to Comment