Press "Enter" to skip to content

सामाजिक कार्यकर्ते अनिकेत वसंत तांडेल यांची ‘पोलीस मित्र’ संघटनेच्या माध्यमातून उरण ‘तालुकाध्यक्ष’ म्हणून निवड

उरण : प्रतिनिधी

‘पोलीस मित्र संघटना’ ही एक मान्यताप्राप्त संघटना असून गेली ३० वर्षे ही संघटना नागरिकांसाठी कार्यरत असून विविध उपक्रम राबवत असते. पोलीस व नागरिक यांच्यामधील मैत्रीचा दुवा म्हणून ही संघटना कार्य करत असून नागरिकांसाठीही अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते. पोलीस मित्र संघटनेचे मुख्य कार्य म्हणजे पोलीस आणि जनता यांच्यात एक मजबूत नाते निर्माण करणे, पोलिसांना त्यांच्या कामात मदत करणे, कायदा सुव्यवस्था राखणे, वाहतूक व्यवस्था गुन्हेगारी तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहाय्य करणे, गुन्हेगारी विषयी संशयित घटनांची माहिती पोलिसांना देणे, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांना मदत करणे, अपघात किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांना मदत करणे , सामाजिक समस्यांवर जनजागृती, महिलांवरील अन्याय अशा अनेक सामाजिक समस्यांवर जनजागृती करणे, पर्यावरणाबद्दल जनजागृती, संघटनेच्या वतीने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून ही संघटना कार्य करत असते. तसेच लोकांच्या समस्या पोलिसांपर्यंत पोहोचवणे त्यावर तोडगा काढण्यासाठी मदत करणे,अशा विविध उपक्रमाअंतर्गत पोलीस मित्र संघटना कार्यरत असते.

पोलीस मित्र होण्यासाठी कोणत्याही भारतीय नागरिकाला पोलीस मित्र बनता येते. त्याकरीता सामाजिक रेकॉर्ड चांगला असणे आवश्यक आहे. कोणताही गुन्हा दाखल नसल्यास पोलीस मित्र बनता येते. त्या करीता पोलीस मित्र संघटनेच्या नियमानुसार कागदपत्रे दिल्यास आणि फी भरल्यावर ओळखपत्र दिले जाते.यासाठी स्वयंसेवक म्हणून काम करायचे असते याकरीता कोणताही पगार मिळत नाही.

उरण तालुक्यातील करळ गावचे रहिवासी अनिकेत वसंत तांडेल यांना सामाजिक कार्याची असलेली आवड व सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून नेहमीच अग्रेसर राहून कोरोना काळात रुग्णांसाठी केलेली मदत रस्त्यावरील होणाऱ्या अपघाताची त्वरित घेतलेली दखल यावेळी अपघात ग्रस्त रुग्णांना दवाखान्यात दाखल करणे, अशा प्रकारच्या कार्यात नेहमीच अनिकेत तांडेल हे सहकार्याची भूमिका घेऊन पोलीस मित्र संघटनेकडून कार्यरत रहात असल्याने त्यांना दिनांक २२ जुलै २०२५ रोजी न्हावा शेवा पोलिस ठाणे उरण, येथे डॉ विशाल नेहूल (सहायक पोलिस आयुक्त पोर्ट विभाग) बापू तुळशिराम ओवे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक) वजितेंद्र मिसाळ साहेब यांच्या शुभहस्ते पोलिस मित्र संघटनेच्यावतीने उरण तालुका विभागातून तालुकाध्यक्ष म्हणून पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाच्या वेळी पोलीस मित्र संघटनेचे श्याम घाडगे, (संस्थापक अध्यक्ष) विजय ठाकूर (रायगड जिल्हा संघटक), प्रकाश ठाकूर ( निवेदक, सामाजिक कार्यकर्ते ) प्रणाल ठाकूर, सुनील मालुसरे,अशोक कोळी, शक्ती पाटील ,महेंद्र कोळी, नरेश कोळी ,प्रशांत गुप्ता , रियाज अन्सारी, समीर पाटील, शुभम पाटील, सिद्धेश भोपी, वैभव तांडेल, वेरिक्त चाळके ,विघ्नेश पाटील, विशाल दडस , राहुल बारलिंगे ,गणेश पाटील, स्नेहा वार्डे, अलिषा नाखवा, बाळकृष्ण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.