


पनवेल (प्रतिनिधी) दरवर्षी एक जुलै नंतर इनरव्हील क्लबचे नवीन वर्ष सुरू होते आणि नवीन प्रेसिडेंटचा पदग्रहण सोहळा पार पडतो. याला अनुसरून सन २०२५-२६ या वर्षासाठी शुभांगी शिरीष पिंपळकर यांची इनरव्हील क्लब ऑफ पनवेलच्या अध्यक्षा म्हणून तसेच डॉक्टर सौ अमृता सुमुख नाईक यांची सचिव म्हणून सर्वानुमते निवड झाली. त्यानुसार त्यांचा पदग्रहण सोहळा दिमाखात पार पडला. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून इनरव्हील डिस्ट्रिक्ट ३१३ च्या डिस्ट्रिक्ट चेअरमन पनवेलच्या प्रसिद्ध गायनाकॉलॉजीस्ट डॉक्टर शोभना शैलेश पालेकर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्वलन तसेच इनरव्हील प्रार्थनेने झाला. यानंतर माजी अध्यक्ष डॉक्टर विणा निखिल मनोहर यांनी गतवर्षी केलेल्या कामाचा आढावा घेतला. आणि नूतन अध्यक्षा शुभांगी पिंपळकर यांच्याकडे पदभार सोपविला.
यावर्षी खजिनदार म्हणून अवंतिका मारूलकर, आय एस ओ शिल्पा चंदने, एडिटर म्हणून वर्षा ठाकूर तसेच सीपीसी म्हणून सुलभा निंबाळकर यांची नेमणूक झाली आहे. या प्रसंगी करुणेश्वर वृद्धाश्रमाला धान्य वाटपाचा प्रोजेक्ट करण्यात आला.हा प्रोजेक्ट क्लब च्या सिंधुताई सपकाळ या ग्रूप ने स्पॉन्सर केला होता, कार्यक्रमाच्या शेवटी व्हाईस प्रेसिडेंट संयोगिता बापट यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता माजी व्हॉइस प्रेसिडेंट वंदना लघाटे यांनी गायलेल्या पसायदानाने झाली.





Be First to Comment