Press "Enter" to skip to content

ओम नमःशिवाय टूर्स पनवेलच्या माध्यमातून ४० यात्रेकरूंची अमरनाथ यात्रा सफल


पनवेल दि. २२ ( वार्ताहर ) : ओम नमःशिवाय टूर्स पनवेल च्या माध्यमातून पंचक्रोशीतील ४० यात्रेकरूंची अमरनाथ यात्रा सफल होऊन ते पुन्हा सुखरूप परतले आहेत .

भगवान श्री शिवशंकर भोलेनाथ यांनी पार्वती मातेला ज्या गुफे अमरकथा सांगितली. परंतु ती अमर कथा. 2 कबुतरांच्या जोडीने ऐकली. आणि ते दोघे अमर झाले. आज हजारो वर्षा पासून त्या गूफे मध्ये भगवान शिवांची नैसर्गिक बर्फाची शिवलिंग तयार होते त्याचे दर्शन घेण्या साठी लाखो भाविक दरवर्षी देशात व परदेशातून तेथे जात असतात .

पनवेल येथील ओम नमः टूर्स चे यंदाचे २५ वे वर्ष असून आयोजक खंडेश धनावडे आणि आश्विन सातारकर यांच्या सोबत पनवेल, नवी मुंबई, भाताण, रसायनी तसेच मुंबई अश्या विविध ठिकाणी हून 40. यात्रे करून चा ग्रुप करून 10 दिवसाच्या यात्रेचे नियोजन करण्यात आले होते . यात अमरनाथ यात्रेसह वैष्णो देवी व काश्मीर आदींचा समावेश होता . सदर यात्रा करून भक्तगण सुखरूपपणे परतले यावेळी त्यांनी बंम बंम भोले चा जयजयकार करीत यात्रा सफल केली . या यात्रे साठी दर वर्षी फेब्रूवारी महाशिवरात्री झाल्यावर आम्ही बुकिंग सुरू करतो अशी माहिती आयोजक खंडेश धनावडे आणि आश्विन सातारकर यांनी दिली .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.