

४३ स्पर्धक महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; सौ. स्नेहा ठाकुर यांना प्रथम क्रमांक
उरण (घन:श्याम कडू)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कु. अदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली, खासदार श्री. सुनीलजी तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पाककला स्पर्धा २०२५’ चे आयोजन चिरनेर गावातील पी.पी. खारपाटील हायस्कूल व कॉलेजच्या सभागृहात करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा महिला अध्यक्षा सौ. उमाताई संदीप मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा महिला उपाध्यक्षा सौ. प्रितमताई जाधव, उरण तालुका अध्यक्षा सौ. कुंदा ठाकूर, उपाध्यक्षा सौ. सुमिता तुपेकर, प्राध्यापिका सौ. सुलोचना पाटील, सामाजिक कार्यकर्त्या सौ. भारती कटेकर, सौ. उज्ज्वला ठाकूर, सौ. सुगंधा कडू, सौ. कामिनी ठाकूर, चिर्ले ग्रामसंघ बचतगट अध्यक्षा सौ. विश्रांती घरत, सौ. साक्षी धुमाळ, सौ. जान्हवी मॅडम, सि.डी.पी.ओ. सौ. पल्लवी भोईर, उरण तालुका अध्यक्ष श्री. परिक्षीत ठाकूर, उरण विधानसभा अध्यक्ष श्री. वैजनाथ ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन श्याम ठाकूर यांनी केले.
पाककला स्पर्धेस एकूण ४३ महिला स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विविध पारंपरिक व नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थांनी परीक्षकांच्या चविष्ट परीक्षा घेतली. परीक्षक सौ. प्रितमताई जाधव यांना निर्णय देताना कठीण प्रसंगाचा सामना करावा लागला, इतके सर्व पदार्थ उत्कृष्ट बनवले गेले होते.
बक्षीस विजेते खालीलप्रमाणे:
प्रथम क्रमांक: सौ. स्नेहा नितीन ठाकुर (चिरनेर)
द्वितीय क्रमांक: सौ. राणी सागर ठाकुर (धुतूम)
तृतीय क्रमांक: सौ. प्रणाली प्रविण घरत (धुतूम)
उत्तेजनार्थ पारितोषिक विजेते:
सौ. अर्पिता जगदीश जोशी (चिरनेर)
सौ. ज्योती सुरेश म्हात्रे (चिरनेर)
सौ. आश्विनी ज्ञानेश्वर ठाकुर (धुतूम)
स्पर्धेत सादर करण्यात आलेले काही खास पदार्थ:
शेवग्याचे पकोडे व कढीपत्ता चटणी, मिक्स थालीपीठ व केशर फालुदा, चिंबोऱ्याचे लॉलिपॉप, रव्याचे आप्पे, तांदळाचे लाडू, भाकरी-चिकन ओले वाटण व तांदळाची खीर – हे सर्व पदार्थ उपस्थितांच्या जिभेवर लज्जतदार ठसा उमटवून गेले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या तसेच पी.पी. खारपाटील विद्यालय व महाविद्यालयाच्या प्रशासनाने मोलाचे सहकार्य केले. हॉल, माईक सिस्टीम, टेबल व खुर्च्यांची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांनी आभार मानले.




Be First to Comment