Press "Enter" to skip to content

मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांची “वीर तानाजी मालुसरे”पुरस्कारासाठी निवड

मुंबई ( पी. डी. पाटील): ‘श्री शिवाजी ज्ञानपीठ (इंटरनॅशनल) ही संस्था छत्रपती शिवाजी महाराजांचे सिद्धांत ठेऊन सामाजिक कार्य करणाऱ्यांचा सत्कार करते. संस्थेच्या वतीने २०२५ सालासाठी देण्यात येणाऱ्या वीर तानाजी मालुसरे पुरस्कारासाठी मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे साहेब यांची निवड केली आहे. या पुरस्काराचे स्वरूप मानचिन्ह, शाल, श्रीफळ व रु. ११,००१/- (अकरा हजार एक रोख) असे आहे.

संस्थेच्या वतीने यापूर्वी श्री. संभाजी राजे छत्रपती, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. सदाशिव शिवदे, प्रो. मोहन आपटे, श्री. पांडुरंग बलकवडे, श्री. प्रमोद मांडे, श्री. पी. आर. मुंडले, प्रा. पी. के. घाणेकर, डॉ. जयसिंगराव पवार, श्री. सुनील पवार व डॉ. सुचित्रा ताजणे यांना पुरस्काराने तर महावीरचक्र प्राप्त कॅप्टन मोहन ना. सामंत, शौर्य चक्र व सेना मेडल प्राप्त भा. नौ. निवृत्त ले. कर्नल तुषार जोशी, निवृत्त लेफ्ट. कर्नल एस. एस. हेरवाडकर, निवृत्त मेजर अनिल माटवणकर, निवृत कॅप्टन प्रफुल तावडे यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि विचार यांचा अभ्यास करण्यासाठी ‘श्री शिवाजी ज्ञानपीठ (इंटरनॅशनल)’ ची स्थापना डॉ. हेमंतराजे गायकवाड यांनी केली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला जागतिक स्थान मिळवून देणे हे ‘श्री शिवाजी ज्ञानपीठ (इंटरनॅशनल)’ चे मुख्य उ‌द्दिष्ठ आहे.याच उ‌द्देशाने डॉ. हेमंतराजे गायकवाड यांनी ‘शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना जगातील १० महान योद्ध्यांशी केली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे या सर्व योद्ध्यांपेक्षा कसे श्रेष्ठ आहेत हे सिद्ध केले आहे. या पुस्तकाला ग्रंथालय भारतीचा पुरस्कार परमपुज्य मोहनजी भागवत यांच्या हस्ते मिळाला आहे.

श्रीमती. प्रतिभाताई पाटील (माजी राष्ट्रपती), श्री. मोहन भागवत, श्री. उदयनराजे भोसले, श्री. अशोक चव्हाण, श्री. अण्णा हजारे, श्री. मनोहर जोशी, श्री. पृथ्वीराज चव्हाण, श्री. राज ठाकरे, श्रीमती. वर्षा गायकवाड यांनी पुस्तकाला शाबासकीची थाप दिली आहे.या पुस्तकावर आधारीत ‘शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट’ या मराठी डॉक्युमेंटरी फिल्मची निर्मिती केली आहे. तसेच हि फिल्म इंग्रजी, हिंदी, कन्नड, संस्कृत आणि बंगाली मध्ये भाषांतरित केली आहे.मा. रवींद्र मालुसरे यांना हा पुरस्कार दादर येथील श्री शिवाजी मंदिर येथे दि. १५ सप्टेंबर २०२५ रोजी दु. ३:०० ते सायं. ६:०० या वेळेत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
या पुरस्कार निवडी बद्दल संघाचे सर्व पदाधिकारी, वृत्तपत्र लेखक, पत्रकार, मित्र मंडळी व नातलग ,परिवार यांच्याकडून त्यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.