
पेण येथील सावकार सूर्यकांत पाटील व भरत पाटील या दोघांवर छापा
पेण, ता. २० (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्यात अवैधरित्या सावकारी होत असल्याची तक्रार जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे येताच त्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि सहाकार पणन व वस्त्रोद्योग या विभागाने पेण येथील परवानाधारक सावकार सूर्यकांत पाटील व भरत पाटील या दोघांवर छापा टाकला आहे.
या छाप्यामध्ये कर्जदारांसोबत बनविण्यात आलेल्या वचन चिठ्या, बॉंड, काही धनादेश जप्त केले असून पुढील चौकशीसाठी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पेण यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.पेण मधील परवानाधारक सावकार सूर्यकांत जोमा पाटील (वय ७०), भरत सुर्यकांत पाटील (वय ३५) रा.आमंत्रण बिल्डिंग गोदावरी, चिंचपाडा यांचे विरोधात अवैधरित्या सावकारी व्यवसाय करत असून जनतेची पिळवणूक करून लूट करत असल्याची लेखी तक्रार जिल्हा पोलिस अधिक्षक आंचल दलाल यांच्याकडे आल्यावर सदर घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण व सहाकार पणन व वस्त्रोद्योग या विभागाला पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले.
अवैधरित्या सावकारीला आळा घालण्यासाठी दि. १८ रोजी पेण येथील परवानाधारक सावकार सूर्यकांत पाटील व भरत पाटील यांच्या घरी तसेच हॉटेल गोमांतक येथे छापे मारले असता या छाप्यामध्ये कर्जदारांसोबत बनविण्यात आलेल्या वचन चिठ्या, बॉंड, काही धनादेश जप्त केले असून पुढील चौकशीसाठी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पेण यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.सदरच्या छाप्यामुळे रायगड जिल्ह्यातील अवैधरित्या सावकारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार तीन पथके तयार करून शहरातील परवानाधारक सावकार सूर्यकांत पाटील आणि भरत पाटील यांच्या रहात्या घरी तसेच हॉटेल येथे छापे मारले असता त्यांच्याकडे वचन चिठ्ठ्या, बॉन्ड आणि काही कोरे चेक आढळून आले आहेत यामध्ये जे योग्य पुरावे आहेत ते आम्ही गोळा केले असून याबाबतची पुढील कारवाई सुरू आहे.अशी माहिती सुभाष कोळी सहाय्यक निबंधक सहकार संस्था पेण यांनी दिली आहे.




Be First to Comment