Press "Enter" to skip to content

शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षातील कामोठे येथील शिवसैनिकांनी घातला सिडको अधिकाऱ्यांना पाणी टंचाईवरून घेराव


पनवेल दि. १८ ( वार्ताहर ) : गेल्या ४ महिन्यांपासून संपूर्ण कामोठे शहरात अनियमित आणि कमी पाणी पुरवठा होत असूनसेक्टर११ ,१२,१४,१६,१७,१८,३४,३५ आणि ३६ मध्ये तर सलग दोन दोन दिवस पाणी येत नसून नागरिक खूप त्रस्त आहेत. अजून पण सोसायटी मध्ये नियमित पाणी येत नाही आणि खूप कमी प्रमाणात पाणी येत आहे आणि दिवसातून फक्त १ ते २ तास पाणी येत आहे. याच्या निषेधार्थ आज शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षातील कामोठे येथील शिवसैनिकांनी सिडको भवन येथे जाऊन सिडको अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला .

शिवसेना कामोठे शहरप्रमुख रामदास गोवारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर प्रमुख सचिन मनोहर त्रिमुखे यांनी कार्यकारी अभियंता प्रशांत चेहरे आणि प्रफुल देऊर यांची भेट घेऊन त्यांना पाणी टंचाई संदर्भात जाब विचारला यावेळी शहर संघटक संतोष गोळे विभाग प्रमुख बबन गोगावले शहर संघटक संजय जंगम सचिन तांबोळी, सागर उकार्डे , विठ्ठल चव्हाण ,महिला आघाडीच्या सौ रेवती सपकाळ , सौ मीना सदरे ,सौ दिक्षा मंगेश लवंगारे , यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि विविध सोसायटीचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपशहर प्रमुख सचिन मनोहर त्रिमुखे यांनी सांगितले की गेल्या ४ महिन्यांपासून संपूर्ण कामोठे शहरात अनियमित आणि कमी पाणी पुरवठा होत असून सेक्टर ११,१२,१४,१६,१७,१८,३४,३५ आणि ३६ मध्ये तर सलग दोन दोन दिवस पाणी येत नसून नागरिक खूप त्रस्त आहेत. अजून पण सोसायटी मध्ये नियमित पाणी येत नाही आणि खूप कमी प्रमाणात पाणी येत आहे आणि दिवसातून फक्त १ ते २ तास पाणी येत आहे. त्या संदर्भात अनेक तक्रारी येत असून रोज टँकर चे पाणी विकत घेण्याची वेळ आमच्यावर आली आहे.कामोठे मध्ये पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी सिडकोची कामोठे मध्ये एकच पाण्याची टाकी आहे त्यामुळे कधी पाण्याच्या टाकीचे काहीही काम निघाले कि पाणी एक ते दोन दिवस कामोठे मध्ये पाणी येत नाही आणि कामोठे पहिले लोकसंख्या खूप कमी होती आता तीच लोकसंख्या दुपटं झाली आहे . त्यामुळे नागरिकांना खूप त्रास होतो तरी कामोठे मध्ये नवीन पाण्याची टाकीचे काम सुरु आहे ते जलद गतीने करून नागरिकांना लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरु करावा. तसेच पाणी सोडायची वेळ सकाळी आणि संध्याकाळी निश्चित ठेवावी त्यामुळे प्रत्येक सोसायटी ला कळेल कि आणि किती वाजता चालू करायचे याबाबतची तरर्तुत त्वरित करावी अन्यथा रायगड भवन बेलापूर विभाग कक्ष जवळ येथे ३१/०७/२०२५ या रोजी आमरण उपोषण आणि अंदोलनाच्या करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.