
पनवेल – येथील देवद ग्रामस्थांसाठी दिनांक १५ जुलै या दिवशी सनातन संस्था या न्यासाच्या वतीने सकाळी १० ते १२ या वेळेत दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये एम्. जी. एम्. रुग्णालयातील वैद्या स्वाती सिंग यांनी रुग्णांची तपासणी केली. त्यांच्यासमवेत त्यांचे सहकारी वैद्या ऋतू बोरे, वैद्या सेजल छतलावे आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. रोहन कांबळे आदी उपस्थित होते. शिबिरात दंत चिकित्सा करून दातांच्या आजारांची कारणे आणि उपाय सांगण्यात आले. काही शिबिरार्थींना औषधे लिहून दिली. या शिबिराचा एकूण ४० ग्रामस्थांनी लाभ घेतला.




Be First to Comment