





पनवेल महानगरपालिका शाळा क्रमांक ०१ , ०२ आणि ०४ मध्ये वर्ग अंतर्गत फेरी मोठ्या उत्साहात
पनवेल (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, वक्तृत्वकौशल्य वाढवणे आणि सार्वजनिक व्यासपीठावर मोकळेपणाने बोलण्याची सवय लावणे या उद्देशाने आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धेची वर्ग अंतर्गत फेरी पनवेल महानगरपालिका शाळा क्रमांक ०१ , ०२ आणि ०४ मध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. कोशिश फाऊंडेशन आणि पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या वक्तृत्व स्पर्धेला विविध शाळेतील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक राजू सोनी, भाजपचे पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंझाराव, उपाध्यक्ष केदार भगत, सरचिटणीस रूपेश नागवेकर, उपाध्यक्ष प्रभाकर बहिरा, सांस्कृतिक सेल जिल्हा अध्यक्ष अभिषेक पटवर्धन, कोमल कोळी, देवांशू प्रभाळे अनिमेष पटवर्धन, हर्षल बहाडकर,जयेश चव्हाण, शिक्षक आदी उपस्थित होते.
या शाळांमधील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी माझं कुटुंब, माझं स्वप्न, शिक्षणाचं महत्त्व, प्लास्टिक मुक्त भारत, स्वच्छ भारत, इंटरनेट वरदान की शाप अशा समकालीन व विचारांना चालना देणाऱ्या विषयांवर प्रभावी भाषणं दिली. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आणि उत्साहाने आपले विचार सादर केले. या उपक्रमामुळे मुलांमध्ये सार्वजनिक बोलण्याची भीती कमी झाली असून भाषणकलेचा पाया मजबूत झाला आहे. त्यामुळे पनवेल महानगरपालिका शाळांतील मुलांना व्यासपीठ, व्यक्तिमत्व विकासाची संधी मिळाली आहे.
यावेळी सुमित झुंजारराव यांनी म्हंटले कि, विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठी आणि आपले विचार निर्भीडपणे मांडण्यासाठी असे मंच अत्यंत उपयुक्त आहेत. वक्तृत्व ही केवळ स्पर्धा नसून व्यक्तिमत्व विकासाचे साधन आहे. शाळेचे प्रमुख मुख्याध्यापक लोकनेते दि बा पाटील विद्यालय, श्री वाल्मीक राठोड म्हणाले किम अशी स्पर्धा विद्यार्थ्यांना शब्दांतून व्यक्त होण्याची संधी देते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवते. या संधीचा लाभ घेत विद्यार्थी पुढील फेरीत आणखी तयारीने सहभागी होतील. या फेरीचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी कोशिश फाउंडेशन व महानगरपालिकेचे विशेष आभार मानले. पुढील टप्प्यात शाळा अंतर्गत आणि अंतर शालेय फेरी आयोजित करण्यात येणार असून या शाळांतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी पुढील फेरीसाठी तयारी सुरू केली आहे.





Be First to Comment