

पनवेल दि. 15 (वार्ताहर): रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्रीमती राधाबाई खेमचंद परमार रोटरी कर्णबधिर मुलांची विशेष निवासी शाळा नवीन पनवेल येथे इनरव्हील क्लब सदस्या मा. प्राजक्ता नेरकर यांनी विद्यार्थ्यांकडून राखी तयार करणेे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
सदर प्रसंगी ट्रस्ट चेअरमन अरविंद सावळेकर आणि ट्रस्ट सचिव प्रमोद वालेकर, शाळेच्या प्र. मुख्याध्यापिका शैला बंदसोडे व शाळेतील शिक्षक कर्मचारी वृंद उपस्थित होते. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः राखी तयार करून स्वनिर्मितीचा आनंद घेतला व कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली.





Be First to Comment