
पनवेल दि. १६ ( संजय कदम ) :
पनवेल जवळील अपघात ठिकाण व वेळ मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबई लेनवर कि.मी.4/400 येथे खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गाडीचा टायर फुटून गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातात गाडीतील ५ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
अपघातातील वाहन क्रमांक टी एन ०६ / झेड ८४४७ चालक नामे बजरंग सणवारलाल शर्मा (वय २७) वर्ष, राहणार रोडपाली कळंबोली हे रेनाल्ड कंपनी ची क्विड कार ही चालवत असताना मुंबई लेन किलोमीटर ४/४०० या ठिकाणी आले असता कारचा पुढील डाव्या साईटचा टायर फुटल्याने गाडी वरील नियंत्रण सुटल्याने गाडी पहिल्यां लेनला पलटी झाल्याने अपघातामध्ये गाडीतील ममता बजरंग शर्मा वय २६ वर्ष राहणार कळंबोली, कमलादेवी सणवरलाल शर्मा वय 65 वर्ष राहणार कळंबोली शांती सनवरलाल शर्मा वय ४५ वर्ष राहणार कळंबोली माही बजरंग शर्मा वय ३ वर्ष ,अंशुमन बजरंग शर्मा वय ६महिने हे जखमी झाले आहेत . या अपघाताची नोंद खांदेश्वर पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे .





Be First to Comment