

पेण, ता. १६ (वार्ताहर) : काही दिवसांची विश्रांती घेऊन काल रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण पेण शहर जलमय झाले असून तालुक्यातील अनेक गावांत पुराचे पाणी घुसले आहे.तर दुरशेत गावाचा रस्ता सततच्या पावसामुळे पाण्याखाली गेला रस्त्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे दुरशेत गावातील दळणवळण ठप्प झाले.
तर पेण शहरातील बाजारपेठ, विठ्ठल आळी, कुंभार आळी, उत्कर्ष नगर, चिंचपाडा यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी अवघ्या अर्ध्या तासाच्या पडलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी भरले होते.शहरातील नगरपालिका कार्यालयासमोरील गटारे तुडुंब भरून वाहत असल्याने रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या भाजीपाला विक्रेत्या आदिवासी महिलांची तारांबळ उडाली तर चिंचपाडा येथील सुखसागर सोसायटीमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने तेथील संरक्षक भिंत कोसळली असून पेण उत्कर्ष नगर येथून पाण्याचा निचरा होत नसल्याने अनेकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आज सकाळ पासून पडणाऱ्या या पाण्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात ठिकठिकाणी पाणी साचले होते.





Be First to Comment