
नागोठणे ते वाकण राष्ट्रीय महामार्ग रस्त्याला पावसाच्या पाण्यामुळे आले नदीचे स्वरूप
रायगड : याकूब सय्यद
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अनेक वर्षापासून रखडत रखडत होत आहे आजपर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण रस्त्याचे काम पूर्ण झालेले नसून ह्या राष्ट्रीय महामार्गावरून प्रवाशांना प्रवास करण्याकरिता तसेच वाहनचालकांना वाहन चालवण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागत आहे. दरवर्षीप्रमाणे अगोटीची पावसाचे दिवस जून महिन्यापासून सुरू होते परंतु यावर्षी मे महिन्यापासून लवकरच पावसाला जोरदार सुरू झाली आहे.
सध्या सोमवार ते मंगळवार ह्या दोन दिवसांत सतत पडत असलेला मुसळधार पावसामुळे नागोठणे ते वाकण राष्ट्रीय महामार्गावर पावसाचे पाणी पाणी साचले आहे त्या राष्ट्रीय महामार्ग रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे.
राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर पावसाचे पाणी डपकन सारखे तुंबल्याने पावसाच्या पाण्याचा वाहन चालकांना अंदाजा येत नसल्याने त्या राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरून वाहन चालवणे वाहन चालकाला जिकरीचे झाले आहे त्यामुळे प्रवासी व वाहन चालकांना त्रास सोसावे लागत आहे शासनाने करोड रुपये खर्च करून देखील राष्ट्रीय महामार्गाची पावसाळ्यात दैनि अवस्था झाली आहे राष्ट्रीय महामार्ग रस्त्या करिता करोडो रुपये शासनाचे खर्च करून ते खर्च वाया गेल्याचे जनतेकडून बोलले जात आहे राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर पावसाचे पाणी प्रचंड प्रमाणात साचल्यामुळे रस्त्यावर ट्राफिक जाम होत आहे त्यामुळे जनतेला प्रचंड हाल अपेष्टा सहन करावे लागत आहे ह्याला जबाबदार कोण असे जनता चर्चा करीत आहे.
राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्यामुळे या राष्ट्रीय महामार्गावर कोणतेही घटना घडू नये अपघात होऊ नये त्याकरिता शासकीय अपत्य व्यवस्थापन समिती तसेच स्थानिक पोलीस ठाण्यांकडून वाहन चालक तसेच प्रवाशांची दक्षता घेतली जात आहे.




Be First to Comment