
अनिल काणेकर व चंद्रकांत म्हात्रे पेण प्रेस क्लबच्या प्रगतशील शेतकरी पुरस्कार 2025 ने सन्मानित
शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेऊन प्रगतशील व्हावे – सागर वाडकर
पेण, ता. 15 ( वार्ताहर ) :
शेतकऱ्यांनी केवळ भातशेतीवर अवलंबुन न राहता शेती सोबत फळझाड लागवड, कुक्ककूट पालन, मत्स्यशेती, यासारखे उत्पन्न्न देणारे जोडधंदे करून शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेऊन प्रगतशील व्हावे असे व्यक्तव्य पेण तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी शेतकऱ्यांचा गौरव करताना केले.
रायगड प्रेस क्लब अंतर्गत पेण प्रेस क्लब तर्फे तालुक्यातील प्रगतशील शेतकरी अनिल चंद्रकांत काणेकर, रा. सापोली व चंद्रकांत म्हात्रे रा भाल ता.पेण या दोन शेतकऱ्यांचा सपत्नीक शाल, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर तालुका नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, कृषी अधिकारी सागर वाडकर, रायगड प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गोपाळे, माजी जिल्हा अध्यक्ष विजय मोकल, लहुशेठ पाटील, एस.एच.गायकवाड, कमलेश ठाकूर, प्रदीप मोकल, संतोष पाटील, प्रकाश माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत गोपाळे यांनी सांगितले की, पेण प्रेस क्लब आयोजित शेतकऱ्यांचा सत्कार हा शेताच्या बांधावरचा उपक्रम आहे. आम्ही रायगड प्रेस क्लब तर्फे प्रोत्साहन देण्यासाठी हा सत्कार करतो. शेतीसह इतर फळपिके, मत्स्य शेती करणाऱ्यांची माहिती घेऊन त्यातून दोघांची निवड करतो. शेतकरी टिकला तरच हा देश टिकेल, असे सांगतानाच, रस्ते महामार्गसाठी आंदोलन केली, करत आहोत, असे जिल्हा प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांनी येथे संगितले.
तर कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी सांगितले की, सामाजिक बांधिलकी ठेऊन पत्रकार काम करत आहेत. शेतकऱ्यांचा सन्मान करत आहेत ही चांगली बाब आहे. शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणल्या आहेत. केंद्र व राज्य शासनतर्फे उत्तम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अनेक योजना पुरस्कार आणत आहेत. असे तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी सांगितले. तसेच प्रगतशील शेतकरी अनिल काणेकर आणि चंद्रकांत म्हात्रे यांनी सत्कारानंतर आपले शेतीतील अनुभव व अपेक्षा व्यक्त केल्या. सदर कार्यक्रमाविषयी प्रास्ताविक कमलेश ठाकूर यांनी तर आभार विजय मोकल यांनी मानले.





Be First to Comment