

पेण, ता. १५ (वार्ताहर) : दत्त अवधुत एंटरटेनमेंट, स्वररंग पेण आणि दर्पण व्हिजन एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने कै.पांडुरंग विठ्ठल घांग्रेकर स्मृती चषक राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन कौशिकी हॉंल, दत्त नगर बोरगाव रोड पेण येथे करण्यात आले होते.या स्पर्धेत मोठ्या गटामध्ये निकिता घाग आणि छोट्या गटात दुर्वा सुशांत झावरे यांनी विजेतेपद पटकावले आहे.
तर यामध्ये दुसरा क्रमांक मनाली इंगळे, तृतीय चेतन पाटील, उत्तेजनार्थ केतन गवळी यांच्यासह छोटा गटात दुसरा क्रमांक तपस्या पाटील, तृतीय आराध्य पाटील, उत्तेजनार्थ स्मंद मंदार कोठेकर यांनी बक्षिसे पटकाविली असून त्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.तर परिक्षकांच्या विशेष गटात प्रकाश पाटील, श्रुती नाईक, अर्णव शिंदे, विहान नाईक यांनाही बक्षीसे देण्यात आले.यावेळी दत्त अवधुत एंटरटेनमेंटचे निर्माता कौस्तुभ विलास भिडे, शाल्मली भिडे, विलास भिडे, छाया भिडे, हर्षदा भिडे, स्वररंगचे उपाध्यक्ष सुनिल पाटील, दिव्या घाडगे, कार्याध्यक्ष स्वप्नील साने, अजित साळवी, किरण देव, सुहास तेरवाडकर, सानिया पाटील, स्वरा पाटील उपस्थित होते तर सदर स्पर्धेचे परिक्षण प्रसिद्ध विनोदी अभिनेते जयवंत भालेकर, दिगदर्शक व अभिनेता देवेंद्र सरदार, लेखिका दर्शन कुलकर्णी यांनी केले.
या स्पर्धेसाठी पेण, रोहा, अलिबाग, मुंबई, डोंबिवली, पुणे, धुळे अश्या ठिकाणावरून स्पर्धकांनी भाग घेतला होता.





Be First to Comment