Press "Enter" to skip to content

बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे थाटात उद्घाटन


पनवेल दि. १५ ( वार्ताहर ) : कमलू पाटील यांचा ३३ वा स्मृतीदिन आणि कमल गौरी हिरू पाटील शिक्षण संस्थेचा २८ वा वर्धापन दिनाचे औचित्य साधून बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा उद्घाटन सोहळा तळोजा फेज-२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात लालचंद महाराज राजे (तळोजा मजकूर) यांच्या कीर्तनाने झाली. त्यानंतर महाविद्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला.

उद्घाटनापूर्वी दीपप्रज्वलनाचा सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. उद्घाटनासाठी पूजन विधी शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त डॉ. वैभव विधाते, पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. अशोक गित्ते, नवी मुंबई महानगरपालिकेचे निवृत्त उपायुक्त डॉ. जगन्नाथ सिम्मरकर, वाय.एस.टी. कॉलेजचे प्रा. डॉ. अमित अंबुलकर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, राहुल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. जी. के. डोंगरगावकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील , उपजिल्हाप्रमुख भरत पाटील ,महानगरप्रमुख अवचित राऊत , युवा सेना जिल्हाधिकारी पराग मोहिते , मा. नगरसेवक गणेश कडू , बहुजन वंचित विकास संस्थाचे प्रदेशाध्यक्ष इकबाल नावडेकर, तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रविण भगत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, समाजसेविका प्रेमाचा आप्पा आणि हॉटेल आयशाचे अफरोजभाई शेखभाई शेख यांचा समावेश होता.विद्यार्थी, शिक्षक, गावकरी आणि मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

संस्थेच्या वतीने सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.याप्रसंगी बबनदादा पाटील यांनी आपल्या मनोगतातून उपस्थितांना संबोधित करताना सांगितले, “मी स्वतः शिकलो नाही, पण माझी मनापासूनची इच्छा आहे की माझ्या परिसरात एकही व्यक्ती अशिक्षित राहू नये. याच प्रेरणेतून मी विविध शैक्षणिक उपक्रम राबवत आहे. पुढच्या टप्प्यात मेडिकल कॉलेज सुरू करण्याचाही मानस असल्याचे त्यांनी सांगितले .

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.