
विमान अपघाताला महिना उलटूनही एक रुपयाची मदत नाही ! शासनाच्या घोषणा हवेत विरल्या !
उरण (घन:श्याम कडू)
उरण तालुक्यातील तरुणी मैथिली पाटील हिचा एका विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्या काळजाला चिरणाऱ्या घटनेला आज अक्षरशः महिना उलटून गेला आहे. अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी मोठ्या थाटात विविध मंत्र्यांकडून व प्रशासनाकडून भरघोस मदतीच्या घोषणा करण्यात आल्या. “ही आमची मुलगी आहे”, “सरकार कुटुंबाच्या पाठीशी आहे” असे भावनिक उद्गार प्रसारमाध्यमात झळकले.
मात्र आज एक महिना उलटूनही त्या मदतीचा एक रुपयाही पोहोचलेला नाही. मैथिलीच्या वृद्ध वडिलांना नाईलाजाने मजुरी करावी लागत आहे, तर आई व आजी यांचे डोळे सरकारकडे आशेने लागले आहेत.
प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे सांत्वनाचे फोटो आणि टीव्हीवरील वल्गना यापलिकडे काहीच राहिलेले नाही. प्रत्यक्षात मदतीच्या घोषणा म्हणजे एक ढोंगी स्वप्न ठरलं आहे, आणि लोकशाहीची संवेदनशीलता पुरती गढूळ झाली आहे.





Be First to Comment