
सिडको युनियनच्या अध्यक्षपदी सुभाष पाटील
उरण (घन:श्याम कडू):
सिडको कामगार युनियनच्या अध्यक्षपदी उरण तालुक्यातील मुळेखंड गावातील सुभाष पाटील यांची निवड झाली असून, त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे माजी अध्यक्ष हिरे यांची रवानगी थेट गुन्हेगारी खटल्यात झाली आणि त्यामुळे रिक्त झालेल्या पदावर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सुभाष पाटील यांच्यावर युनियनच्या सभासदांकडून, विविध नेत्यांकडून आणि कामगार वर्गाकडून जोरदार अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
युनियनच्या डागाळलेल्या प्रतिमेला साफ करून पुन्हा एकदा कामगार हक्कांसाठी लढणारी संघटना निर्माण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. सिडको युनियनमध्ये नव्या नेतृत्वामुळे आता कामगार प्रश्नांना नवे वळण मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




Be First to Comment