
रायगड : याकूब सय्यद
राष्ट्रीय सेवा योजना (NSS) ही भारत सरकारची एक योजना आहे, जी महाविद्यालयीन आणि शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना सामुदायिक सेवेमध्ये सहभागी करून घेते. याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना जागृत करणे आणि व्यक्तिमत्व विकास करणे आहे. राष्ट्रीय सेवा योजना (NSS) ची स्थापना
१९६९ मध्ये, महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून NSS ची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव जागृत करणे. सामुदायिक सेवेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व आणि चारित्र्य घडवणे.
याच योजनेतून कै.बापूसाहेब देशपांडे विद्या संकुलाच्या को. ए. सो. श्रीमती गू.रा. अग्रवाल विद्यामंदिर आणि कै. एस. पी. जैन कनिष्ठ महाविद्यालय नागोठणे येथे राष्ट्रीय सेवा योजना स्तर २ यांच्या विद्यमाने वृक्षारोपणाचे कार्यक्रम नुकताच संपन्न झाले. शाळा समिती चेअरमन मा. नरेंद्र शेठ जैन यांच्या प्रेरणेतून आणि प्राचार्या सौ. राधिका ठाकूर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री गोळे सर यांच्या सहकार्याने राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ६० झाडे लावून वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमात सकाळ सत्र प्रमुख श्री गायकवाड सर, शिक्षक प्रतिनिधी श्री गावित सर, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख श्री देवरे सर, श्री शिंदे सर, श्री म्हात्रे सर, श्री नाईक काका आणि ५० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता.
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक स्वयंसेवकाने एक झाड संगोपन करण्यासाठी दत्तक घेतले आहे.





Be First to Comment