Press "Enter" to skip to content

आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा

सुधागड एज्युकेशन सोसायटी, कळंबोली येथे वक्तृत्व स्पर्धेची वर्गांतर्गत फेरी उत्साहात संपन्न

पनवेल (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे,  बोलण्याचे कौशल्य विकसित करणे आणि नव्या पिढीला नेतृत्वक्षम बनवणे, या उद्देशाने माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कोशिश फाऊंडेशन व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कऱण्यात आलेल्या ‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व’ स्पर्धेची वर्ग अंतर्गत फेरी कळंबोली येथील सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी माझं कुटुंब, माझं स्वप्न, शिक्षणाचं महत्त्व, प्लास्टिक मुक्त भारत, इंटरनेट वरदान की शाप असे विचारांना चालना देणारे विषय निवडून प्रभावी भाषणं सादर केली. प्रत्येक विद्यार्थ्याने आपले विचार स्पष्ट, आत्मविश्वासपूर्वक आणि रसाळ शैलीत मांडले.

       यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे कळंबोली मंडल अध्यक्ष व स्थायी समिती सभापती अमर पाटील, माजी अध्यक्ष रवींद्र पाटील, माजी नगरसेवक रवींद्र भगत, राजू शर्मा, माजी नगरसेविका प्रमिला पाटील, मोनिका महानवर, रामा महानवर, संदीप म्हात्रे, सुनील ढेंम्बरे, प्रकाश शेलार, संदीप भगत, सीत्तु शर्मा, अमर ठाकूर, जमीर शेख, ज्ञानेश्वर चौधरी, द्यानश्याम शर्मा, आभा गुरकुडे, केशव यादव, देविदास खेडेकर, दीपक दुधवडे, कळंबोली युवा मोर्चा अध्यक्ष गौरव नाईक, निशान गिल,  दिलीप बिष्ट यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

       शाळेचे मुख्याध्यापकांनी सांगितले की,  “या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना स्वतःला व्यक्त करण्याची संधी मिळते. हीच पिढी उद्या समाजाचे नेतृत्व करणार आहे.विद्यार्थ्यांनी आपले विचार मोकळेपणाने मांडताना आत्मविश्वास, प्रेझेंटेशन स्किल्स आणि विचारांची मांडणी या बाबींमध्ये निश्चितच प्रगती केली. वर्ग अंतर्गत फेरीतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शाळा अंतर्गत फेरीत सहभागी होता येणार आहे. कोशिश फाउंडेशनच्या पुढाकाराने आणि अध्यक्ष परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळांमध्ये अशा स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. याबद्दल विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी फाउंडेशनचे  विशेष आभार मानले.

       भाजपा युवा मोर्चा, कळंबोली अध्यक्ष गौरव नाईक म्हणाले, “विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व ही केवळ स्पर्धा नसून व्यक्तिमत्व विकासाचं साधन आहे. मी श्री. परेश ठाकूर साहेब व कोशिश फाउंडेशनचे आभारी आहे. या वर्ग अंतर्गत फेरीमुळे शाळांमधील विद्यार्थ्यांना समान संधी मिळत असून ‘स्वतःला व्यक्त करण्याची कला’ शिकवणारी ही स्पर्धा खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या विकासाचा मजबूत पाया ठरते. शाळेतील शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थ्यांच्या उत्तम प्रतिसादामुळे स्पर्धा यशस्वी झाली असून, पुढील फेरीसाठी विद्यार्थ्यांमध्ये नवा जोश निर्माण झाला आहे.

आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५  वक्तृत्व स्पर्धेमुळे शाळेतील मुलांना व्यक्त होणे आणि  शिकण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळाले आहे. अशी संधी शाळांपर्यंत पोहोचवणं हे खरं सामाजिक काम आहे. ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला आणि व्यक्तिमत्व विकासाला मोठी चालना देणारी आहे. आमदार श्री प्रशांतदादा ठाकूर व कोशिश फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी सभागृह नेते पनवेल महानगरपालिका यांचे आभार व्यक्त करतो

— श्री. अमर पाटील- अध्यक्ष, भाजपा कळंबोली मंडल  
More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.