Press "Enter" to skip to content

तटकरेंचे महायुतीत घरफोडी चे प्रयत्न

खा. सुनील तटकरे यांच्याकडून माणगाव शिवसेना नगराध्यक्ष व नगरसेवक यांना प्रत्येकी 25 लाखाचा आमिष दाखवून फोडण्याचा प्रयत्न : शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांचा आरोप

रायगड : याकूब सय्यद

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्यासाठी दिवसरात्र शिवसेनेच्या पक्ष कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली तसेच त्यांना खासदार बनविले तेच राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशअध्यक्ष व खासदार सुनील तटकरे हे महायुतीत मित्र पक्ष शिवसेनेच्या रायगड जिल्ह्यातील पदाअधिकारी नगराध्यक्ष नगरसेवक यांना पक्षात घेण्यासाठी प्रत्येकी नगरसेवक यांना 25 लाखाचा आमिष दाखवून यांच्यावर दबाव तंत्राचा वापर करीत आहेत. असा आरोप शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

रायगड जिल्ह्यातील माणगांव नगर पंचायतवर शिवसेना महायुतीची सत्ता असताना त्या ठिकाणी कट कारस्थान करून शिवसेनेचे नगराध्यक्ष नगरसेवक तसेच रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी यांना फोडण्याचे प्रयत्न मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माध्यमातून खासदार तटकरे यांचे कार्य सुरूच आहे.

प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आपल्या पदाचा गैर वापर करीत विविध कंपन्यांच्या सी एस आर निधीचा राजकीय स्वार्थापोटी वापर करीत आहेत. आमच्या शिवसेना पक्षाचे राज्य प्रवक्ते राजीव साबळे यांच्या माणगाव येथील शिक्षण संस्थाला विविध कंपन्यांच्या सी एस आर निधीतून दहा कोटी रुपये देण्याची साबळे यांना आमिष दाखवून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश ओढून घेण्यासाठी हे सर्व कपटी व घाणेरडे सुड बुद्धीचे राजकारण पदाचा गैरवापर प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याकडून केला जात आहे.

प्रदेश अध्यक्ष व खासदार सुनील तटकरे हे महायुतीमध्ये एकत्र राहून जिल्ह्यात आपल्या पदाचा गैर वापर केवळ राजकारणासाठी तसेच रायगड जिल्ह्यामध्ये आपले राजकीय अस्तित्व कायमस्वरूपी टिकवण्याकरिता करीत आहेत. जिल्ह्यात प्रदेशाध्यक्ष तसेच खासदार सुनील तटकरे यांचे कडून चुकीच्या पद्धतीचे षडयंत्रण रचले जात आहे तसेच त्यांच्या पदाचा ते गैरवापर करीत आहेत.

चुकीच्या पद्धतीचा षडयंत्रण तसेच प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या पदाचा गैर वापर तात्काळ थांबला पाहिजे अशी जनते तर्फे मागणी माननीय नामदार देवेंद्र फडवणीस साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार उदय सामंत साहेब उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे लेखी पत्राद्वारे शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी केली असल्याची पत्रकार परिषदेत माहिती देताना घोसाळकर यांनी सांगितले आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.