Press "Enter" to skip to content

‘बुके’ नव्हे ‘बुक’ संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा


आमदार.विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रमांची मालिका

पनवेल, दि.१३ जुलै:
आमदार विक्रांत दादा पाटील यांचा वाढदिवस यंदाही सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. शनिवार, दिनांक 12 जुलै रोजी पनवेल विधानसभा क्षेत्रातील कामोठे, कळंबोली, खारघर, नवीन पनवेल , आसुडगाव, खांदा कॉलनी, तळोजा व करंजाडे या ठिकाणी विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले

“बुके नव्हे, बुक” या संकल्पनेतून वाढदिवस साजरा करत आ. विक्रांत पाटील यांनी एक सकारात्मक संदेश दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक उपक्रमांची जी मालिका राबवली गेली, त्यामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

कामोठे येथे मोफत दंत तपासणी व आरोग्य शिबिर, खांदा कॉलनी येथील मोफत आरोग्य व दंत चिकित्सा शिबिर येथे नागरिकांची मोफत एनजॉग्रफी एन्जोप्लास्टी ( हृदय शस्त्रक्रिया) , तर ज्येष्ठ नागरिकांसाठी माधवबाग खोपोली येथे आरोग्य सहल आयोजित करण्यात आली. या शिबिरांच्या माध्यमातून कामोठे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय सुविधेचा लाभ घेतला. या आरोग्य शिबिराचे आयोजन युवा महाराष्ट्र प्रतिष्ठान, स्वप्निल काटकर, तुषार साळुंखे, संदीप मोहिते ,हरिदास जी वणवे व सहकारी यांनी केले.

कळंबोली येथे प्रभुदास भोईर यांच्या पुढाकाराने वाहनचालकांना मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले. यामध्ये हेल्मेटचा वापर करून सुरक्षित प्रवास करण्याचा संदेश देण्यात आला. नवीन पनवेल येथे टेबल टेनिस स्पर्धा, तसेच इयत्ता १०वी व १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ‘गुणगौरव व प्रेरणादायी मार्गदर्शन सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देणारा कार्यक्रम सुसंवाद आणि सकारात्मकतेने भरलेला होता. तसेच तळोजा फेज – 2 वासियांकरिता खारघर रेल्वे स्टेशन ते केदार गृह संकुल सोसायटी या NMMT बस सेवेचा शुभारंभ देखील या वेळी करण्यात आला.

आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त करंजाडे येथे आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेचे आयोजन श्री. ज्वालासिंह देशमुख, श्री. प्रथमेश पुंडे, श्री. आशिष साबळे आणि सहकाऱ्यांच्या पुढाकाराने करण्यात आले. तसेच करंजाडे येथे भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते, ज्याचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.

आसूडगाव येथे शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या व शालेय साहित्य किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन श्री. रणजित देशमुख आणि सहकाऱ्यांच्या माध्यमातून यशस्वीरित्या पार पडले. आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत खांदा कॉलनी येथील सकल मराठा समाजातर्फे इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि प्रेरणादायी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवासासाठी योग्य दिशा देण्यात आली.

खारघर येथे श्री. समीर कदम यांच्या पुढाकाराने ‘फुटबॉल चषक स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये परिसरातील अनेक क्रीडाप्रेमींनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.

खास मातृ शक्तीसाठी ‘होम मिनिस्टर –खेळ रंगला पैठणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन नवीन सुधागड शाळा, कळंबोली येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्री.देवीदास खेडेकर आणि सहकाऱ्यांनी या उपक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन केले.

आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या मंगल अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त मोफत छत्री वाटप, महिला भगिनींना धान्य किट वाटप, रिक्षा चालकांना सीएनजी कूपन वाटप, तसेच विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप व शालेय वस्तूंचे वाटप मंत्री गणेश नाईक, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाले.

या कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनाबद्दल बोलताना मंत्री गणेश नाईक म्हणाले, “विक्रांत पाटील विधान परिषदेत अभ्यासपूर्ण मुद्दे मांडणी करत असून, नागरिकांचे प्रश्न सातत्याने प्रभावीपणे मांडत आहेत.”महाराष्ट्रभर पक्ष संघटनाच्या विस्तारासाठी आणि भारतीय जनता पक्षाच्या बळकटीकरणासाठी विक्रांत पाटील अत्यंत सक्रिय भूमिका बजावत आहेत.” त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांचे भविष्य निश्चितच उज्वल आहे.”

खासदार रामशेठ ठाकूर यांनी “विक्रांत पाटील हे नम्र स्वभावाचे, सर्वांना आपलेसे करणारे असे एक लोकाभिमुख युवा नेते आहेत. पनवेल विधानसभा क्षेत्रातील विविध प्रश्न ते विधान परिषदेत अभ्यासपूर्वक, सातत्याने आणि प्रभावीपणे मांडत आहेत.”असे उद्गार रामशेठ ठाकूर यांनी यावेळी काढले.

पनवेल विधानसभा क्षेत्रात एकाच दिवशी सामाजिक उपक्रमांची ही मालिका राबविणे ही एक सामाजिक चळवळच ठरली असून, या उपक्रमांना नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. खऱ्या अर्थाने समाजाशी नाळ घट्ट ठेवत सामाजिक भान जपत विधायक पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचा एक आदर्श आमदार विक्रांत पाटील यांनी प्रस्थापित केला आहे.

या अभिष्टचिंतन सोहळ्यास मा. गणेश नाईक – वनमंत्री, महाराष्ट्र राज्य,माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर , माजी खासदार संजीव नाईक,आ. प्रशांत ठाकूर , कोकण म्हाडा माजी सभापती श्री बाळासाहेब जी पाटील,जे.म् म्हात्रे माजी नगराध्यक्ष,श्री. प्रीतम म्हात्रे ,श्री. अविनाश कोळी , भाजयुमो प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, भाजपा प्रदेश कामगार आघाडी अध्यक्ष विजय हरगुडे ,राहुल लोणीकर, पनवेल विधानसभा क्षेत्रातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर,तसेच महाराष्ट्रभरातून आलेले भारतीय जनता पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.