
रोह्याचे पत्रकार समीर बामुगडे पनवेल अपहरण प्रकरणात पनवेल पोलीस अजूनही संभ्रमित अवस्थेत..?
पनवेल – प्रतिनिधी
27 जून 2025 रोजी पनवेल बस स्टॅन्ड वरून अपहरण झालेले रायगड जिल्ह्यातील रोहा येथील पत्रकार समीर बामुगडे यांच्या अपहरण प्रकरणात दोन आठवडे उलटून देखील पनवेल पोलीस केवळ कागदी घोडे नाचवत बसले आहेत. अपहरणकर्ते आज देखील खुलेआम मोकाट फिरत आहेत.अजूनही कोणतीच कारवाई न झाल्याची खंत पत्रकार समीर बामुगडे यांनी पनवेल येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
त्यांनी पनवेलमध्ये आपल्यावर घडलेल्या घटनेचे सविस्तर विवेचन पनवेलच्या पत्रकारां समोर केले. 28 जून रोजी त्यांनी शहर पोलीस स्टेशन येथे जेष्ठ पत्रकार किरण बाथम यांच्यासह भेट घेऊन आपली लेखी तक्रार पुराव्यासह पोलीस स्टेशनमध्ये सादर केली होती. आरोपीच्या आणि त्याच्या सहकारी मंडळींच्या पूर्व गुन्हेगारी पार्श्वभूमीकेच्या पुराव्यासह सदर तक्रार त्यांनी दाखल केली. अपल्याला या लोकां पासून धोका आहे. त्यांना त्वरित अटक करून चौकशी करावी अशी मागणी केली होती. मात्र तब्बल दोन आठवड्यात पनवेल पोलिसांनी फक्त चर्चा करून आरोपीना काहीही केले नसल्याने तक्रारदार पत्रकार समीर बामुगडे यांना पोलीस तपासाचे वैषम्य वाटत आहे.
त्यांना पनवेल पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचे म्हणणे पोलिसांनी ऐकले. मात्र त्यानंतर देखील आरोपी आणि त्याच्या सहकाऱ्यांना कोणतीही कारवाई केल्याचे दिसले नाही.आज त्यांनी पत्रकारांसमोर आपली व्यथा मांडली.
खरंतर पत्रकार संरक्षण कायदा मंजूर झालेला आहे. त्यामुळे हे प्रकरण खुप महत्वाचे आहे. पण इतर सामान्य जनतेला जो विदारक अनुभव पोलिसांचा मिळतो. तस्साच अनुभव लेखी तक्रार आपलं म्हणणं मांडून दोन आठवडे उलटले तरी तोच मिळत असल्याचे बामुगडे यांनी स्पष्ट केले.




Be First to Comment