
सकाली उठल्या बरोबं मिलतान
नाश्ट्याला डोसा ना इडली
कया जेली भाकरीचे जोरीची
जवला,सुकाट ना मांदेली
इचरा जरा च बना त नी
तुमचे आसला,आमचे आसला
आता नुडल्स विथ शेजवान चटनी
दुपारचे जेवनाला लागतं
पोरांचापुन पिझ्झा शिवाय कया सांगा भागतं?
भाताचे बरोब कोंबरा-मटनाचा बेत कला नसतं!
इचरा जरा च बना त नी
तुमचे आसला,आमचे आसला
चावलाच्या भाकरी झल्या आता खोट्या
लागतान आमान हाटेलान तंदुऱ्या रोट्या
मावऱ्याचे नावावं खातावं ‘बरफानच्या’ बोट्या
मारले क आपुनच आपले पायावं खुट्या?
इचरा जरा च बना त नी
तुमचे आसला,आमचे आसला
सोवल्यान डिश पंजाबी ना पारटीला चायनीज
नाश्टा ढोकला-फाफडा ना भैयांची भेल न सॅन्डवीज
आपून ‘मराठी’ फकस्त हाव ना सांगा यांना पोसाला
तोड ह क आगरी,मालवणी ना कोल्हापुरी ज्यावनाला
पुन तयार हाव क धंद्याला
ना आपले मानसाला पुरं नेवाला?
इचरा जरा च बना त नी
तुमचे आसला,आमचे आसला!
- सर्वेश रविंद्र तरे
( लेखक – आगरयान )





Be First to Comment