
पाटील हॉस्पिटल समोरून महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पिओ गाडीची चोरी
पनवेल दि. १२ (संजय कदम) : शहरातील पाटील हॉस्पिटल समोर उभे करून ठेवलेल्या महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पिओ गाडीची चोरी अज्ञात चोरट्याने केल्याची घटना घडली आहे.
जकीया अकबर अली कादरी (वय ६८) यांची १ लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एमएच ०६ एडब्ल्यू ६६१७ हि पाटील हॉस्पिटल समोरील रस्त्यावर उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने सदर गाडी चोरून नेली. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.





Be First to Comment