
पनवेल दि. १२ (वार्ताहर) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडी पनवेलकरांच्या आरोग्यासाठी पुढे सरसावल्या असून प्रभाग क्रमांक १८ व १९ परिसरातील विविध स्वच्छता मोहीम महिला आघाडी शहर संघटिका सौ अर्चना अनिलकुमार कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
यामध्ये त्यांनी प्रामुख्याने प्रभाग क्रमांक १८ व १९ मधील दशक्रिया विधी, घाट येथे साफ करुन घेत औषध फवारणी केली. तसेच याठिकाणी वारंवार लक्ष ठेऊन साफ करुन घेणेत येईल असे परिसरातील नागरिकांना आश्वासन दिले. सदर उपक्रम माझे शहर माझे जबाबदारी या अंतर्गत पनवेल महापालिकेच्या सहकार्याने राबवित आहेत.




Be First to Comment