Press "Enter" to skip to content

माहेश्‍वरी महिला मंडळ पनवेल व स्वाती श्री त्रिवेणी फाउंडेशनच्या सहकार्याने वृक्षारोपण


पनवेल, दि.७ (वार्ताहर) ः निसर्ग हा आपला आधार आहे. झाडे केवळ जीवनदायी ऑक्सिजन प्रदान करत नाहीत तर पृथ्वीचे संतुलन देखील राखतात. या उद्देशाने, पनवेल येथील माहेश्‍वरी महिला मंडळाने व स्वाती श्री त्रिवेणी फाउंडेशनच्या सहकार्याने फणसवाडी (तळोजा एमआयडीसी) येथे भव्य वृक्षारोपण मोहीम आयोजित केले होते. यामध्ये विविध औषधी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.

या मोहिमेत मंडळाच्या महिला आणि मुलांनी उत्साहाने भाग घेतला आणि समाजाला पर्यावरण रक्षणाचा सुंदर संदेश दिला. य वृक्षारोपणासोबतच, मुले आणि महिलांनी एकत्रितपणे विठ्ठल-विठ्ठल चा जप करत भजन गायले, ज्यामुळे वातावरण भक्तीपूर्ण आणि उर्जेने भरलेले होते. ही संकल्पना खूप सुंदर आणि प्रभावी होती. यावेळी माहेश्‍वरी महिला मंडळ, पनवेल यांच्यासह स्वाती त्रिवेणी फाउंडेशनचे अध्यक्ष राजकुमार जी जाजू तसेच विशेष सहकार्य काफ संस्थेचे अरुण भिसे, कमिटी सदस्य अध्यक्षा – श्रीमती शोभा गिल्डा, सचिव – श्रीमती ज्योती कलंत्री, कोषाध्यक्ष – श्रीमती स्नेहा लाहोटी, उपाध्यक्ष – श्रीमती सरोज गुप्ता, सह-सचिव – श्रीमती वंदना राठी, सह-कोषाध्यक्ष – श्रीमती दीपा माहेश्‍वरी, सल्लागार – श्रीमती अंजू जाजू आदींचे सहकार्य लाभले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.