
अलीबाग : याकूब सय्यद
मासेमारी नावाच्या खाली अनेक वर्ष डिझेल तस्करी करण्याचे प्रकार चालत होते परंतु रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी रायगड जिल्हा पोलीस दलाचा पदभार स्वीकारल्यापासून डिझेल तस्करीचे अवैद्य धंदे बंद झाले होते. काही दिवसातच पुन्हा मासेमारीच्या नावाखाली डिझेल तस्करीचे अवैद्य धंदेवाले वर डोके काढू लागले आहेत.
मासेमारीच्या नावाखाली डिझेल तस्करी करणाऱ्या एका बोटीवर पोलिसांनी शुक्रवारी कारवाई केली या कारवाईत १४ लाख ३०,००० किमतीचा पाच हजार लिटर डिझेलचा साठा जप्त करण्यात आला आहे याप्रकरणी गणेश कोळी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा आरोपी हा राजू पंडित डिझेल माफियांचा साथीदार असल्याची माहिती समोर येत आहे. साळाव खाडीत डिझेल तस्करी करीत असल्याची रेवदंडा पोलीस ठाण्यामध्ये गणेश कोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील काही महिन्यापूर्वी रायगड जिल्ह्यातील मांडवा रेवदंडा बंदरावर डिझेल तस्करी केली जात होती एका बोटीच्या सहाय्याने डिझेल समुद्र किनाऱ्यावर आणून एका मोठ्या गाडीच्या सहाय्याने इतर ठिकाणी डिझेल वितरण केले जात होते अवैद्य धंदे डिझेल तस्करी ने सागरी किनारपट्टी धक्क्यात येत होती.
डिझेल माफियांना राजकीय मोठे वरदस्त होते त्यामुळे स्थानिक पोलिसांना आपले कर्तव्य बजावण्याकरिता अपयश येत होते
मासेमारीच्या नावाखाली डिझेल तस्करी सुरू होती.
सीमा शुल्क विभागाने या डिझेल तस्करी प्रकरणाकडे लक्ष केंद्र केल्यापासून बत्तीस हजार व चार हजार पाच हजार क्षमतेचे पाच टँकर आणि दोन मासेमारी बोटी ताब्यात घेतल्या होत्या यापूर्वी हा अवैद्य डिझेल तस्करी चा धंदा जोरात चालत होता तसेच या डिझेल तस्करी माफियांची गुंडागर्दी देखील प्रचंड प्रमाणात वाढली होती.
सागरी सुरक्षेचा खरा प्रश्न निर्माण झाला होता.
रेवदंडा पोलीस हद्दीत साळाव खाडीत रात्री गोड झोपेच्या वेळेत डिझेल तस्करी करण्यात येत होती त्यावेळी गणेश कोळी तसेच डिझेल माफिया राजू पंडित यांच्याविरुद्ध त्यावेळी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर काही वृत्तपत्रांनी डिझेल तस्करीच्या बातम्या दररोज प्रसिद्ध केल्या होत्या त्यानंतर त्या गोरख अवैद्य धंदा करणाऱ्या डिझेल तस्करी माफीयांना पोलिसांकडून आळा बसला होता.
मात्र पुन्हा डिझेल तस्करी करणारे गोरख धंदे माफिया सक्रिय झाल्याचे निदर्शनास आले आहे रेवस बंदरावर एका बोटीतून डिझेलची तस्करी होत असल्याची माहिती मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भोई यांना मिळाल्याने शुक्रवार सकाळी पथकाने त्या बोटीवर छापा टाकून पाच ते सहा बोटीची तपासणी केली त्यावेळी श्री समर्थ कृपा बोटीत हजारो लिटर डिझेलचा साठा सापडला पोलिसांनी तो डिझेल साठा जप्त करून डिझेल तस्करी करणाऱ्या विरुद्धात कारवाई केली आहे.
रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आचल दलाल आता यापुढे डिझेल तस्करी करणाऱ्या माफियाविरुद्ध काय भूमिका घेत आहेत या प्रकरणाकडे रायगड जिल्ह्यातील तमाम जनतेचे लक्ष लागले आहेत.




Be First to Comment