Press "Enter" to skip to content

शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने कामोठे विज वितरण कंपनीच्या विरोधात उपोषणाचा इशारा

पनवेल दि. ०६ ( वार्ताहर ) : कामोठे शहरातील गेल्या काही महिन्यापासून मध्य रात्री आणि दिवसा २ ते ३ वेळा विद्युतपुरवठा खंडित होत असल्याने या अनागोंदी कारभाराच्या विरोधात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने कामोठे विज वितरण कंपनी विरोधात उपोषणाचा इशारा दिला आहे .

शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ८०% समाजकारण आणी २०% राजकारण या सुत्रास अनुसरुन शिवसेना शहर कामोठे शिवसेना शहरप्रमुख रामदास गोवारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर प्रमुख सचिन मनोहर त्रिमुखे यांनी कार्यकारी अभियंता सिडको प्रकाश पारधी यांची भेट घेऊन या अनागोंदी कारभाराचा जाब विचारला यावेळी शहर संघटक संतोष गोळे , उपशहर गणेश गांडगे , महिला आघाडीच्या संगीता राऊत, मीना सदरे , दीक्षा लवंगरे, स्मिता लँगरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपशहर प्रमुख सचिन मनोहर त्रिमुखे यांनी सांगितले की ,कामोठे शहरातील गेल्या काही महिन्यापासून मध्य रात्री आणि दिवसा २ ते ३ वेळा लाईट जात आहे. आपल्याला माहीत आहे कि रायगड भागात मान्सून महिन्यात खूप जास्त प्रमाणात पाऊस पडतो आणि कामोठे शहरातील मेन लाईन हे वरून आहेत, आपण मान्सून सुरु होण्या आधी उपाय योजना केल्या पाहिजे होत्या आज महावितरण यांनी मान्सून पहिले सगळी लाईन चेक करून घेतले पाहिजे होती. असे केले असते तर कामोठे शहरात अशी परिस्थिती आली नसती. कामोठे शहरातील प्रत्येक नागरिक वेळोवेळी लाईट बिल भरतात मग त्याना त्याप्रमाणे सुविधा का मिळत नाही तर एक महिना नागरिकांनी लाईट बिल नाही भरलं कि आपले कर्मचारी लाईट कट करायला येतात. आणि महिन्याच्या दर मंगळवारी आपण लाईट घालवून सगळे चेक करतात तरी पण असे वारंवार लाईट का जाते. आह्मी लाईट बिल वेळेवर भरतो कारण आह्माला सुविधा चांगल्या मिळाव्या म्हणून मग अश्या सुविधा मिळत नसतिल तर या अनागोंदी कारभाराविरोधात कामोठे महावितरण कक्षा जवळ येत्या १५/०७/२०२५ या रोजी उपोषण किंवा आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असा इशारा सुद्धा निवेदना मार्फत देण्यात आला आहे .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.