Press "Enter" to skip to content

पनवेल पोलीस गुन्हा कधी दाखल करणार ?

विरोधात बातमी लावल्याने नकली वन अधिकारी बनलेल्या गँगने केले रोह्याच्या पत्रकाराचे पनवेल मधून अपहरण

पनवेल : विशेष प्रतिनिधी

रोहे तालुक्यातील निवी गावचे पत्रकार समिर बामुगडे यांना नकली वनाधिकारी बातमी प्रकरणात त्याच्याशी संबंधित दहा-बारा स्त्री पुरुष टोळीने पनवेल बस स्थानका मधून अपहरण करून रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड मध्ये नेण्याचा धक्कादायक प्रकार घडला.नशिबाने सुटका झालेल्या पत्रकार समिर बामुगडे यांनी शहर पोलीस ठाण्यात जेष्ठ पत्रकार पत्रकार संघटनेचे राज्य प्रतिनिधी किरण बाथम यांच्या सह वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांची भेट घेऊन एक लेखी पत्र देऊन आपली रीतसर तक्रार नोंदवली.

या प्रकरणी अपहृत झालेले बामुगडे आपल्या कामासाठी पनवेलला रोहा-पनवेल बसने पनवेलला आले होते.पळस्पे फाटा पर्यंत बस आल्या नंतर त्यांनी किरण बाथम यांना पनवेल मध्ये पोहचत असल्याचे सूचित केले. किरण बाथम सकाळी 10:15 वाजता पनवेल स्थानकात येऊन बामुगडे यांना फोन लावत असतांना त्यांनी फोन लावला असता त्यांनी फोन रिसिव्हच केला नाही.

उशिरा संध्याकाळी बामुगडे मंडणगड पोलीस स्टेशनला असल्याचे स्पष्ट झाले. मात्र दुसऱ्या दिवशी बामुगडे यांनी त्यांना जबरदस्तीने केल्याचा प्रकार मांडला. त्याच वेळी त्यांनी शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन सगळा प्रकार सांगितला व आपली सविस्तर तक्रार पनवेल शहर पोलीस स्टेशनला
नोंदवली.

समिर बामुगडे यांच्या म्हणण्या नुसार दि 27 जून 2025 रोजी रोहा -पनवेल बस सकाळी 7:15 च्या बसने पनवेलला माझ्या कामानिमित्त आलो होतो. पनवेल बस स्टॅण्डवर गाडी 9:45 वाजता पनवेल आगार मधील दत्त मंदिर जवळ बस थांबली. त्यांनी तत्पूर्वी आपण पोहचत असल्याचे किरण बाथम यांना कळवले होते.त्यावेळी अचानकपणे मला दहा-बारा लोकांनी पनवेल आगारात घेरले.असे त्यांनी स्पष्ट केले.
संबंधीत लोकांमध्ये मला अगोदर परिचय असलेले विजय सीताराम काते,त्याची पत्नी स्वाती काते, त्याचा मुलगा विराज काते, भाऊ अरविंद सीताराम तथा अरुण काते, विजय कातेची परिचित स्वाती विनोद वावडेकर, उत्तम श्याम जाधव व बाकी त्यांचे इतर सहकारी यांनी मला एसटी स्टॅन्डच्या दत्त मंदिरच्या बाजूच्या गेट पासून दुसऱ्या बस बाहेर पडण्याच्या गेट पर्यंत नेले. एका बातमीच्या संदर्भाने माझ्यावर दहशत करत होते. मी त्यांना तुमचा खुलासा तुम्ही देऊ शकता असे म्हटले. त्यांना मी अधिक कारवाई करिता पनवेल पोलीस स्टेशनला जाऊ या असे सुचवले.

मात्र त्यांनी जबरदस्तीने माझा मोबाईल हिसकावून घेऊन मला त्यांच्या गाडीमध्ये कोंबले आणि मला मुंबई-गोवा मार्गाने अगोदर रोह्याला जाऊ, माणगावला जाऊ असे करत साई मोर्बा मार्गे थेट म्हसळे तालुक्यातील शक्तिपीठ नाव असलेल्या भीमाई मठात नेले.वाटेत अरविंद काते यांनी मारहाण केली. काते बंधु घाणेरड्या शिव्या देत होते. त्यांच्या गाडीने मठात आतील भागात फिरवले. काही अजून लोकांना त्यांनी फोन करून बोलावले. त्यानंतर मला त्यांच्या बोलण्या प्रमाणे बोलावे सांगून जबरदस्तीने माझे बोलणे मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केले.माझ्या खिशात जबरदस्तीने काही नोटा टाकल्या. त्याचे देखील रेकॉर्डिंग केले.मी त्यांच्याकडे खंडणी मागायला आलो असे म्हणून त्या रेकॉर्डिंगचा वापर करण्याचा त्यांचा प्लॅन होता. तेव्हा दुपारची 1:00 वाजण्याची वेळ होती.सुमारे दोन तास मठात होतो त्यानंतर साधारण 3:00 ते 3:15 वाजता म्हसळा आंबेत मार्गे पन्हाळी रोडवरून मला मंडणगड परिसरात नेला.त्यांनी मला मंडणगड पोलीस स्टेशनला नेला. पोलिसांनी केलेले रेकॉर्डिंग पाहताच त्यांनाच खडसावले. तुम्ही चुकीचे केले असल्याचे बोलले. मी थोडा धीर पकडला आणि पोलिसांना मला वस्तुस्थिती सांगितली. माझे अपहरण केल्याची माहिती दिली.मंडणगड पोलिसांनी तिथेच पोलीस स्टेशनला त्यांच्या ताब्यातून मला माझा फोन-7774958180 ताब्यात दिला.माजी सभापती आदेश केणी या प्रकरणी पोलीस स्टेशमध्ये आले. त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. ते नंतर निघून गेले.

नंतर पोलीस आणि त्या लोकांनी पुन्हा चर्चा केली.मला त्यांनी त्यांच्या प्रमाणे लिहायला लावले.पोलिसांना मी मला माझ्या घरी सुखरूप सोडण्याची विनंती केली.मला संबंधित आरोपीसोबत पाठवले गेले. त्यानंतर पुन्हा मला मंडणगड midc भागात नेऊन माझ्यावर दहशत करून त्यांनी पुन्हा एक रेकॉर्डिंग केले. मंडणगड पोलीस स्टेशन पासून साधारण 2/3 किमी. अंतर गेल्याने मला परत येण्याची संधी नव्हती. त्यांनी मला गोरेगाव जवळ लोणेर फाटा येथे सोडले. त्यानंतर मी कोलाड नंतर कोलाड ते रोहा एसटी ने प्रवास करून घरी गेलो.

माझ्या सुदैवाने दहा-बारा लोकांच्या तावडीतून मी जिवंत घरी गेलो.सगळ्या घटनाक्रमा नंतर मला जाणवते की,या सगळ्या मंडळी कडून मला केव्हाही धोका होऊ शकतो.कारण पनवेल स्टॅन्ड मधून मला घट्ट पकडून गाडीत आत जबरदस्तीने बसवले, गाडीत कोम्बले.मी घाबरून गेलो होतो.गांगरून गेलो होतो .मला काही सुचत नव्हते मी मदती साठी फोन लावायचा प्रयत्न करत होतो . तेव्हा माझा फोन अरविंद काते याने हिसकावून घेतला.जबरदस्तीने त्यांनी माझे अपहरण केले. त्यामुळे मला भीती वाटते.या सगळ्यांनी माझे अपहरण करून दहशत बसवण्याचा प्रयत्न केला. मला खंडणीच्या खोट्या गुन्हत अडकवण्याचा प्रयन केला. संगनतमताने माझे अपहरण करून जीवित हानी चा धमक्या देवून मला खोट्या नाट्य प्रकरण मध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा विरुध्द कडक कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा.हे सगळे माझा केव्हाही हे घात करून मला जीवे मारू शकतात. त्यामुळे या संदर्भात यांच्यावर पत्रकारावर जीवघेणी दहशत करणे, अपहरण करणे असा गुन्हा केल्याबद्दल गुन्हा दाखल करून मला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी समिर बामुगडे यांनी केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.