Press "Enter" to skip to content

युसुफ मेहरअली सेंटर मध्ये रामदास आठवले यांची उपस्थिती

नवी मुंबई विमानतळाला दिबांच्या नावाबाबत लक्ष द्या ; महेंद्रशेठ घरत यांची रामदास आठवले यांच्याकडे मागणी 

उलवे, ता. २  : “युसुफ मेहेरअली यांचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान आहे. ‘मी राजकारणात, समाजकारणात नाही हारत, कारण माझे मित्र आहेत महेंद्र घरत’. ते  कुठेही असले तरी माझे मित्र आहेत. कामगारांना न्याय देतात. ‘मी आश्वासने देत नाही खोटी, आणून देतो दहा कोटी’, असे रामदास आठवले तारा येथे युसुफ मेहेरअली यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित कार्यक्रमात म्हणाले.

यावेळी महेंद्रशेठ घरत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले, “युसुफ मेहेरअली सेंटरसारख्या सामाजिक संस्थांच्या मागे ठामपणे उभा आहे. मी गेली अनेक वर्षे मुलींच्या मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतोय. त्यामुळे युसुफ मेहेरअली सेंटरमधील मुलींच्या शिक्षणासाठी मी खंबीरपणे उभा आहे. रामदास आठवले हे केंद्रीय मंत्री असल्याने त्यांनी नवी मुंबई विमानतळाला दिबांच्या नावाबाबत लक्ष घालावे.” 
यावेळी महेंद्रशेठ घरत यांनी  ५०  हजार रुपयांची मदत युसुफ मेहेरअली सेंटरला केली आणि दरवर्षी  एक लाख देण्याची घोषणा केली. तेव्हा व्यासपीठावरील आणि समारंभात उपस्थित अनेकांनी युसुफ मेहेरअली सेंटरमधील मुलींना दत्तक घेतले.

यावेळी वैशाली पाटील म्हणाल्या, “युसुफ मेहेरअली यांनी समता, न्याय प्रस्थापित केला. आज अनेकांनी गरीब मुलींना दत्तक घेऊन पालकत्व स्वीकारले, ही आनंदाची बाब आहे. रायगड जिल्ह्यात अनेक कातकरी आदिवासी आहेत, पण सरकारी पातळीवर आमची फरपट होतेय, सामाजिक न्यायमंत्री म्हणून ठोस भूमिका घ्या, रायगड जिल्ह्यात अनेक कातकरी कुटुंबे उघड्यावर राहातात. पीएम घरकुल योजनेचा बोजवारा उडालाय. निधीचा पत्ताच नाही.”

यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कोंग्रेसचे  रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत, वैशाली पाटील, नरेंद्र गायकवाड, प्रकाश मोरे, मोनिष गायकवाड, उल्का धुरी,  आदी मान्यवर उपस्थित होते. खराची तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ ही साने गुरुजी यांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मधू मोहिते यांनी प्रास्ताविक आणि आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.