
नागोठणे : याकूब सय्यद
महाराष्ट्र शासनाने आपले सरकार पोर्टल द्वारे जिल्हा रायगड व पोलीस ठाणे पातळीवर नागरिकांना यापुढे ऑनलाइन पद्धतीने सर्व सेवा पुरविल्या जाव्यात अशा प्रकारची चांगले निर्णय ऑनलाइन पोर्टल द्वारे महाराष्ट्र राज्याच्या सरकारने घेतले आहेत. आपल्या जिल्ह्यात व आपल्या गावात कोणीही पीडित नागरिक शासनाच्या कोणत्याही सुविधेपासून वंचित राहू नये म्हणून महाराष्ट्र शासनाने ऑनलाइन लोकसेवेचा महत्त्वपूर्ण निर्णय लोकांचे हिताच्या दृष्टीने घेतला आहे.
महाराष्ट्र शासन आपले सरकार पोर्टल द्वारे जिल्हा व पोलीस ठाणे पातळीवर लोकांना पुरवल्या जाणाऱ्या सर्व सेवाची अमलबजावणी यापुढे रायगड पोलीस दलाकडून पुरवली जाणार आहे. आपले सरकार पोर्टल ह्या ऑनलाइन सर्व सेवाची जनतेत जनजागृती व्हावी म्हणून नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. सचिन कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार यांनी दिनांक ०१/०७/२०२५/ रोजी संध्याकाळी ५: वाजता संपूर्ण नागोठणे शहरात पोलीस रॅली द्वारे लोकसेवेचे बॅनर झलकावून पोलिसांनी लोकांमध्ये मोठी जनजागृती केल्याने तमाम नागोठणेतील जनतेने नागोठणे पोलीस ठाण्याचे आभार व्यक्त केले.

Be First to Comment