Press "Enter" to skip to content

वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम 2025 अमेरिका येथे झालेल्या स्पर्धेत सुभाष पुजारी यांना २ गोल्ड मेडल

वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम 2025 बरमिंगहम,आलाबामा -अमेरिका.(USA) या ठिकाणी झालेल्या स्पर्धेत सुभाष पुजारी यांनी २ गोल्ड मेडल मिळविले.

सुभाष पुजारी पोलीस निरीक्षक नवी मुंबई यांनी बॉडी बिल्डिंग या प्रकारात 172 cm उंची गटामध्ये गोल्ड मेडल व मेन फिजिक या प्रकारामध्ये गोल्ड मेडल मिळविले. तसेच आणि नवी मुंबई व महाराष्ट्र पोलीस दलाचे व देशाचे नाव उंचावून भारताचा तिरंगा अभिमानाने फडकविला.

सुभाष पुजारी हे या स्पर्धेसाठी दररोज सहा तास मिस्टर ऑलिम्पिया श्री सुनीत जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत होते. या स्पर्धेसाठी 76 देशातील संघानी सहभाग नोंदविला.

सुभाष पुजरी यांनी आतापर्यंत 10 इंटरनॅशनल मेडल मिळवलेले आहेत
या स्पर्धेसाठी त्यांना मिलिंद भारंबे सर पोलीस आयुक्त नवी मुंबई.
श्री श्रीकांत पाठक साहेब सह पोलीस आयुक्त ठाणे शहर.
प्रीती टिपरे मॅडम,पोलीस अधीक्षक डायल 112 नवी मुंबई.
पत्नी रागिणी पुजारी, आनंद गुप्ता व विवेक गुप्ता संचालक गॅम्प्रो ड्रिलिंग कंपनी खालापूर राइनोमाइट क्लिनिक अंधेरीचे डॉ,कनिष्क जैन व डॉ,असीम माथन ,सुदर्शन खेडकर ऋषी पेणकर विशेष सहकार्य लाभले.

त्यांच्या या यशाबद्दल रश्मी शुक्ला ,पोलिस महासंचालक,
मिलींद भारंबे ,पोलीस आयुक्त नवी मुंबई. श्री निखिल गुप्ता अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था ) श्रीकृष्ण प्रकाश सर अप्पर पोलीस महासंचालक (प्रशासन), अभिषेक त्रिमुखे साहेब विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी व सहकारी मित्र सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.