Press "Enter" to skip to content

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून आयोजकांचे कौतुक

पनवेल युवा जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल / प्रतिनिधी
जागृती फाउंडेशन व तायक्वांडो असोसिएशन ऑफ पनवेल शहर यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल युवा चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन जागृती फाउंडेशनचे अध्यक्ष तथा ‘पनवेल युवा’चे संपादक निलेश सोनावणे यांनी केले होते. तायक्वांडो असोसिएशन ऑफ पनवेल शहर यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित केलेल्‍या या स्‍पर्धेत अध्यक्षा प्रज्ञा भगत, सचिव संजय भोईर, खजिनदार हेमंत कोळी, सहसचिव संदीप भगत, वीर तायक्वांडो अकॅडमीचे अध्यक्ष हरेश्वर भगत यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आयोजकांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कौतुक केले.

यावेळी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी या स्पर्धेला भेट दिली. निलेश सोनावणे हे पत्रकारिता करीत असताना विविध क्षेत्रात सामाजिक काम करीत असल्याने आजच्या स्पर्धेचे आयोजनही उत्तम केले असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. सामाजिक काम करीत असताना निलेशला काही सूचना करायच्या असल्या तर त्यादेखील वयाने वडीलकीच्या, मार्गदर्शकाच्या नात्याने वेळोवेळी करीत असल्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

या स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तर या स्पर्धेला लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, आर. पी. आय. पनवेल महानगरपालिका जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे, ॲड. प्रणाली कांबळे, उद्योजक इकबालशेठ काजी, पनवेल महानगरप्रमुख शिवसेना रामदास शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस शिवदास कांबळे, उद्योजक सुरेश फडके, माजी नगरसेवक गणेश कडू, माजी नगरसेवक सुनील बहिरा, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेविका दर्शना भोईर, मुकुंद म्हात्रे, माधुरी गोसावी आदी मान्यवरांनी या स्पर्धेला भेट दिली.

विविध वजनी गटात आयोजित या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून शेकडो स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. यावेळी या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जागृती फाउंडेशनचे अध्यक्ष तथा ‘पनवेल युवा’चे संपादक निलेश सोनावणे यांनी केले. यावेळी निलेश सोनावणे यांनी जागृती फाउंडेशन करीत असलेल्‍या सामाजिक कार्याची माहिती उपस्थित मान्यवरांसमोर सांगितली. जागृती फाऊंडेशन पर्यावरण, कला-क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात काम करते, विविध सामाजिक उपक्रम सातत्‍याने राबविले जात असल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी सांगितले. स्वतः तायक्वांडोमधील ब्लॅक बेल्ट परीक्षा उत्तीर्ण असून सध्या प्रॅक्टिस करीत नसलो तरी या खेळावर मनापासून प्रेम करीत असल्याने ही स्‍पर्धा भरवली असल्याचे आपल्या मनोगतात सोनावणे यांनी सांगितले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जागृती फाऊंडेशनचे युवा अध्यक्ष अरिन सोनावणे, तळोजा विभागीय अध्यक्ष कल्पेश कांबळे, उपाध्यक्ष संदेश पाटील, पनवेल अध्यक्ष मुकुंद कांबळे, गिरवले विभागीय अध्यक्षा अर्चना राजगुडे, शिरवली विभागीय अध्यक्ष प्रितेश भोईर, सोमटणे विभागीय अध्यक्ष मयूर गायकवाड, पनवेल शहर युवा अध्यक्ष जश राठी, सचिव समीर शेलार, तायक्वांडो असोशिएशन ऑफ पनवेल शहर, वीर तायक्वांडो अकॅडमीच्या पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.