
पनवेल, दि.30 (संजय कदम) ः पनवेल शहर पोलिसांनी कर्नाळा स्पोर्टस अॅकॅडमी ते टी पॉईंटकडे जाणार्या रोडवरील ब्रीजजवळ सापळा रचून दोघा इसमांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून जवळपास 1 लाख 5 हजार रुपये किंमतीचे हेरॉईन हा अंमली पदार्थ हस्तगत केला आहे.
पंजाब येथून सतनाम सिंग सुखदेव सिंग (31) व सुखविंदर सिंग मुकनार सिंग (59) हे दोघे जण बेकायदेशीररित्या अंमली पदार्थ घेवून येणार असल्याची माहिती वपोनि नितीन ठाकरे यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.अभिजीत अभंग, पोउपनि हजरत पठाण, पो.ना.प्रवीण मेथे, पो.ना.रवींद्र पारधी, पो.शि.साईन मोकळ, पो.शि.शशिकांत काकडे आदींच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे 35 ग्रॅम वजनाचा हेरॉईन हा अंमली पदार्थ आढळून आला. सदर अंमली पदार्थ कोणास देण्यासाठी आणला होता याबाबत पुढील तपास पोउपनि हजरत पठाण करीत आहेत.

Be First to Comment