
पनवेल, दि.30 (वार्ताहर) ः पनवेलजवळील काळुंद्रे गाव येथील तीन वेगवेगळ्या किराणा दुकानात पनवेल शहर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणात हजारो रुपये किंमतीचा सुगंधी पानसाला व गुटख्याचा साठा पोलिसांनी हस्तगत केला आहे.
महाराष्ट्रात गुटखा विक्रीस बंदी असताना सुद्धा अनेक जण याची छुप्या मार्गाने विक्री करीत असल्याची माहिती वपोनि नितीन ठाकरे यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि विनोद लभडे, पोउपनि हजरत पठाण, पो.हवा.अविनाश गंथडे, पो.हवा.नितीन वाघमारे, महेंद्र वायकर, परेश म्हात्रे, योगेश दिवेकर, पो.ना.सम्राट डाकी, पो.शि.चंद्रशेखर चौधरी, महिला पो.शि.मिरा आंबेकर आदींच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून या तीन वेगवेगळ्या दुकानातून हजारो रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Be First to Comment