Press "Enter" to skip to content

हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांचा लेख

सावधान ! वारीची भक्तीपरंपरा विकृत केली जात आहे !

पंढरपूरची वारी म्हणजे जणू विठ्ठलभक्तांचा चालता कुंभमेळाच ! शेकडो वर्षांची ही वारी परंपरा आध्यात्मिक परंपरेचे प्रतिनिधत्व करते. ही वारी एखाद्याने थोडीदेखील अनुभवली असेल, पाहिली असेल, ती व्यक्ती वारकऱ्यांचा भोळा भाव, साधेपणा, शिस्त पाहून भारावून गेल्याविना रहाणार नाही. या वारीमध्ये कुणी एकमेकांना जात विचारत नाही, प्रांत विचारत नाही, आर्थिक उत्पन्न विचारत नाही; पण सर्व जण एकमेकांशी आपुलकीच्या आणि विठ्ठलभक्तीच्या धाग्याने जोडलेले असतात. भक्तीची ही ताकद आहे; पण गेल्या काही वर्षांपासून ही वारी विकृत करण्याचा प्रयत्न चालू आहे. संविधान समतेच्या नावाखाली देवा-धर्माला (केवळ हिंदु धर्माला) शिव्या देणे, हे आयुष्याचे इतिकर्तव्य मानणारी मंडळी ‍वारीत शिरकाव करू पहात आहे. या अश्रद्ध लोकांच्या दिंडीचे नाव समता दिंडी असले, तरी त्यांचा मूळ हेतु मात्र वारकरी संप्रदायाच्या विभाजनाचा आणि भा‍विकांचे ‘ब्रेनवॉश’ करण्याचा आहे. म्हणूनच आवश्यकता आहे, अखंड सावध रहाण्याची आणि प्रसंगी ‘नाठाळाचे माथी हाणू काठी’ ही शिकवण आचरणात आणण्याची !

समता दिंडीला आक्षेप का ? : पुण्यातील फुलेवाड्यापासून चालू होणाऱ्या दिंडीमध्ये जे लोक सहभागी होतात, त्यांची पार्श्वभूमी भारतीय संस्कृतीशी द्रोह करण्याची आणि देशाशी प्रतारणा करण्याची आहे. ‍वर्ष २०२२ मध्ये संविधान समता दिंडीमध्ये शीतल साठे, सचिन माळी, अविनाश पाटील, ज्ञानेश्वर बंडगर, शरद कदम, संदीप आखाडे आदी उपस्थित असल्याचा उल्लेख एका वृत्तपत्रात करण्यात आला होता. यातील शीतल साठे आणि सचिन माळी हे कट्टर नक्षलवादी देशद्रोहाच्या खटल्यात तुरुंगात होते. ते सध्या जामिनावर बाहेर असल्याचे समजते. ही मंडळी पुण्यात ‘कबीर कला मंच’च्या नावाने नक्षलवादाचा प्रसार करत असत. गेल्या काही वर्षांत आपल्याला शहरी नक्षलवाद म्हणजे ‘अर्बन नक्षलिझम्‌’ हा शब्द कानावर पडत आहे; पण या शहरी नक्षलवाद्यांनी खूप आधीपासून पुण्यात ‘स्लो पॉयझनिंग’ चालू केले होते. या दोघांसह अंनिसवालेही खांद्याला खांदा लावून सहभागी झाले होते. अंनिसचे नक्षलवाद्यांशी संबंध होते, या आरोपाची पुष्टी करणारी ही अजून एक घटना !

 गेल्याच महिन्यात रायगडमध्ये सुनील जगताप या नावाने वावरणाऱ्या अंनिसच्या कार्यकर्त्याला पुणे आतंकवादविरोधी पथकाने अटक केली. जगताप हा कबीर कला मंचसाठी काम करायचा आणि तो एक कट्टर नक्षलवादी होता. यातून समता दिंडीवाल्यांचा वारीत येण्याचा नेमका उद्देश काय, हा प्रश्न उपस्थित होतो. याच विचारसरणीच्या लोकांनी पंतप्रधान मोदी यांच्या हत्येचा कट रचला होता. त्यामुळे वारीमध्ये काही घातपात घडवण्याचा तर त्यांचा उद्देश नाही ना, अशी शंका मनात आल्याविना रहाणार नाही.

संकट नि’वारी’ : वारीमध्ये जर संविधान समतेच्या नावाने नक्षल विचारांचे लोक सहभागी होत असतील, तर पोलिसांनी त्यावर लक्ष ठेवून प्रतिबंधात्मक कारवाई करणे आवश्यक आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी नुकताच भारत नक्षलवादमुक्त करण्याचा पुनरुच्चार केला आहे, तोही नक्षल प्रभावित बस्तर या गावात जाऊन. त्या दृष्टीने वेगवेगळी ‘ऑपरेशन्स’ राबवण्यात येत आहेत. हे आवश्यक आणि स्वागतार्ह आहेच. सरकार जंगलात रहाणाऱ्या बंदूकधाऱ्या नक्षलींचा बंदोबस्त करील; पण ज्या नक्षल्यांनी निर्मूलनवाल्यांचा, समतावाल्यांचा किंवा पर्यावरणवाद्यांचा बुरखा पांघरून शहरांमध्ये बस्तान बसवले आहे, त्यांचे काय ? या शहरी नक्षलवाद्यांचा बिमोड कसा होणार ?

    आज वेगवेगळ्या माध्यमांतून वारीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुण्यात नसीम शेख अब्दुल नावाच्या महिलेने दिंडीतील एका महिला वारकऱ्यावर मांसाचा तुकडा फेकून मारला. फातिमानगर परिसरात एक महिला व्यसनमुक्तीच्या नावाने येशू आणि बायबलविषयक पत्रके वाटत होती. दुसरीकडे अबू आझमी यांनी ‘रस्त्यावरील वारी चालते, तर नमाजपठण का नाही’, अशा आशयाचा प्रश्न विचारून फूत्कार सोडले. हे फूत्कार सोडतांना ते हे सोयीस्करपणे विसरले की, वारकरी भक्तीचा सुगंध पसरवत जातात, तर रस्त्यावर नमाजपठण करणारे त्यानंतर जाळपोळ आणि हिंसाचार करतात.      

   पुण्यामध्ये नुकतेच सारसबागेत धर्मांधांनी मांसाहाऱ करून मंदिर परिसराचे पावित्र्य भंग केले. पुण्यातूनच काही वर्षांपूर्वी इसिसशी संबंधित आतंकवादी पकडले गेले, तेव्हा या लोकांना कोंढव्यामध्ये जाऊन संविधान, समता वगैरे शिकवण्याचे शहाणपण सुचत नाही. त्यांच्याकडून आळंदीज‍वळ होणाऱ्या कत्तलखान्याला विरोध होत नाही. गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी म्हटले की, यांना प्रदूषण आठवते आणि ईद म्हटली की, इस्लामचे गोडवे गायला कंठ फुटतो, त्यांचे हिंदूंच्या वारीमध्ये काय काम ? जे लोक संतांनी केलेले चमत्कार नाकारतात, संत तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन, इंद्रायणीतून गाथा वर येणे, संत ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदवणे, भिंत चालवणे हे नाकाऱतात, त्यांना हरिभक्तांनी वारीमध्ये का सहभागी करून घ्यावे ?

   यंदा ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्यासह अनेक वारकऱ्यांनीही अशा बेगडी पुरोगामी लोकांचा निषेध करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस अशांवर कारवाई कधी करणार, हा खरा प्रश्न आहे.

     वास्तविक, जो गळ्यात तुळशीची माळ घालतो, हऱिपाठ म्हणतो, एकादशीचे व्रत करतो, मांसाहाऱ करत नाही तो वारकरी ! संविधान समता दिंडीवाले यातील कोणत्या गोष्टींचे पालन करतात ? श्रद्धावानांच्या जत्थ्यात घुसून कुविचारांचा प्रसार करण्याची हिंमत या संविधान समता दिंडीवाल्यांना होते, याचा अर्थ बडी राजकीय किंवा आर्थिक ताकद त्यांच्यामागे असणार ! त्या दृष्टीनेही याचा विचार होण्याची आवश्यकता आहे.             

     देव-धर्म यांना विरोध करणारे समतेचा बुरखा पांघरून हिंदूं‍वर सांस्कृतिक आणि वैचारिक आघात करायला येत आहेत. ‘चेहरा एक आणि मुखवटे अनेक’, अशी ही मंडळी आहेत. आता हरिभक्तांनी भक्तीच्या जोडीला शक्ती दाखवून देण्याची आवश्यकता आहे. वारकरी जसा हरिनामाचा गजर करतो, तसा तो अधर्मावर ‘वार’ही करू शकतो, हे दाखवण्याची ही वेळ आहे.

      जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, ‘धर्माचे पालन करणे पाखंड खंडण’ याचा अर्थ, पांखड्यांचे खंडण करणे, हे धर्मपालनच आहे. त्यामुळे संविधान समता दिंडीच्या नावाने घुसणाऱ्यांचे आणि त्यांच्यासारख्या पाखंड्यांचे खंडण करणे, हेच तुकोबारायांना अपेक्षित आहे. वारीच्या निमित्ताने पाखंड खंडण करण्याची प्रेरणा हरिभक्तांना व्हावी; अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना !

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.