Press "Enter" to skip to content

श्री एकविरा देवस्थान द्वारे ट्रस्टड्रेस कोड लागू

यापुढे एकवीरा मंदिरात तोकडे कपडे ,अंगप्रदर्शन,मिनी स्कॅट्स,हाफपॅन्ट चालणार नाही


मुंबई प्रतिनीधी : सतिश वि.पाटील

महाराष्ट्र राज्याची कुलस्वामीनी, आराध्यदैवत ,जागृत देवस्थान असलेले व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले कार्ला गडावरील श्री एकविराआई देवी.

श्री एकविराआई देवीच्या सर्व आपल्या सारख्या भाविकांच्या सहकार्याने, तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या मार्फत श्री एकविराआई गडावर व गड परिसरात विविध विकास कामे चालू आहेत. श्री. एकविरा आई च्या आशीर्वादाने गडावर व गड परिसरात पावित्र्य व मांगल्य राखून सर्व भाविकांना सहजतेने व सुलभतेने श्री एकविराआई देवीचे दर्शन व्हावे हा एकविराआई देवस्थान ट्रस्ट च्या सर्व विश्वस्त मंडळाचा मनोदय आहे.

श्री .एकविराआई देवी च्या आशीर्वादाने कार्ला गडावर पवित्र व मांगल्य राखण्यासाठी श्री.एकविराआई देवी ट्रस्ट च्या सर्व विश्वस्त मंडळाने एक नवीन ड्रेस कोड नियम राबवला आहे परी कृपया सर्व भाविकांनी श्री एकविराआई देवी कार्ला गडावर दर्शनास येताना नियमाचे पालन करावे व पावित्र्य जपावे.

दिनांक: २७जून २०२५ पासून लागू करण्याचा ठराव एकविराआई देवी ट्रस्ट व विश्वस्त मंडळ याच्याकडून कडून करण्यात आले आहे ते नियम पुढील प्रमाणे : दिनांक: ७ जुलै २०२५ पासून हे कपड्याचे नियम (ड्रेस कोड) लागू करण्यात आले आहेत तोकडेकपडे ,अंगप्रदर्शन,मिनी स्कॅट्स,हाफपॅन्ट, असे चालणार नाहीत याची सर्व भाविकांनी नोंद घ्यावी .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.