
विंडसर्फिंग व काईट बोर्डिंग या समुद्रातील खेळात पाच पदके पटकावून प्रियांशी पाटील हिने कोरले नाव
मुंबई प्रतिनिधी : सतिश वि.पाटील
उरण परिसरातील रोटरी इंग्लिश मीडियम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज उरण बोरी येथे इयत्ता आठवी या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी कुमारी प्रियांशी मयूर पाटील राहणार केगाव – दांडा हिने अवघ्या चार महिन्यांच्या सरावाने विंडसर्फिंग व काईट बोर्डिंग या समुद्रातील खेळात पाच पदके पटकावून नाव कोरले आहे.

कु. प्रियांशी मयूर पाटील
महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत 26 मार्च ते 30 मार्च 2025 या कालावधीत याचिंग असोसिएशन ऑफ इंडिया यांनी आयोजित केलेल्या YAI ऑल इंडिया विंडसर्फिंग अँड काईट बोर्डिंग चॅम्पियनशिप मोर्जिम गोवा यामध्ये कांस्य पदक, 13 एप्रिल ते 17 एप्रिल 2025 या कालावधीत इंडियन नेवल सेलिंग असोसिएशन यांनी आयोजित केलेल्या चॅम्पियनशिप मध्ये रौप्य पदक, 23 एप्रिल ते 27 एप्रिल 2025 या कालावधीत गोवा याचिंग असोसिएशन यांनी आयोजित केलेल्या सेल गोवा टेक्नो 293 OD अंडर 15 गर्ल्स या स्पर्धेत कांस्य पदक, 3 मे ते 10 मे 2025 या कालावधीत याचिंग असोसिएशन ऑफ इंडिया यांनी आयोजित केलेल्या YAI युथ नॅशनल रँकिंग इव्हेंट्स या स्पर्धेत कांस्य पदक, 20 जून ते 25 जून 2025 या कालावधीत रॉयल मैसूर सेलिंग क्लब यांनी आयोजित केलेल्या YAI युथ अँड ज्युनियर मल्टी क्लास चॅम्पियनशिप 2025 या स्पर्धेत रौप्य पदक पटकावला आहे.

Be First to Comment