
भारतीय जनता पार्टी प्रितम जनार्दन म्हात्रे जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून 29 जून रोजी जॉब इंटरव्यूचे आयोजन
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल, नवी मुंबई, मुंबई परिसरामध्ये नोकरीच्या अनेक संधी तरुणांसाठी उपलब्ध आहेत. त्याचेच एक पाऊल म्हणून भारतीय जनता पार्टी प्रितम जनार्दन म्हात्रे जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून 29 जून रोजी जॉब इंटरव्यूचे आयोजन करण्यात आले आहे.
29 जून रोजी सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत जॉब इंटरव्यूचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बायकर, बॅक ऑफिस, ऑपरेशन स्टाफ, पिकर पॅकर, फिल्ड ऑडिटर, डिलिव्हरी एक्झिक्यूटिव्ह, सपोर्ट स्टाफ, व्हॅन बॉय, काउंटर स्टाफ इन्स्टॉलर /हेल्पर, फार्मासिस्ट या पदासाठी जॉब इंटरव्यू होणार आहे. पनवेल शहरातील भारतीय जनता पार्टी प्रितम जनार्दन म्हात्रे जनसंपर्क कार्यालय, गुरु शरणम कॉम्प्लेक्स, विश्राळी नाका, मार्केट यार्ड येथे या जॉब इंटरव्यूचे आयोजन करण्यात आले आहे.
आपल्या परिसरात विकासासोबतच नव्याने उद्योगधंदे येत आहे त्याप्रमाणे रोजगार सुद्धा वाढत आहे. यावेळी आपल्या विभागातील तरुणांना संधी मिळावी या उद्देशाने आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे.
प्रितम जनार्दन म्हात्रे
मा.विरोधी पक्षनेते
पनवेल महानगरपालिका

Be First to Comment