

पनवेल(प्रतिनिधी) कामोठे येथील कैलास गोपाळराव शिंदे यांच्या कन्या भाग्यश्री आणि मयुरी शिंदे यांना उच्च शिक्षणासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून आर्थिक मदत करण्यात आली असून सदरचा धनादेश श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते आज (दि. २६) सुपूर्द करण्यात आले.
सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य अशा विविध क्षेत्रात गेल्या तीस वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन स्वतः च्या पायावर उभे केले जाते. भाग्यश्री शिंदे पिल्लई महाविद्यालयात बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस) तर मयुरी शिंदे बॅचलर ऑफ अकाऊंटींग अँड फायनान्स (बीएएफ) हे शिक्षण घेत असून भाग्यश्रीला ४१ हजार ८३० रुपये तर मयुरीला ८० हजार ४५० रुपयांची आर्थिक मदतीची आवश्यकता होती. आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संधी उपलब्ध करून देणे, हा मंडळाचा नेहमीचा उद्देश राहिला आहे, त्यानुसार हि मदत करण्यात आली. सदरचा धनादेश देताना भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, सुरेश पोरजी, महेंद्र गोजे, पालक कैलास शिंदे, मंडळाचे व्यवस्थापक अनिल कोळी उपस्थित होते.

Be First to Comment