Press "Enter" to skip to content

आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व रेनकोटचे वाटप

रायगड प्रतिनिधी(पी. डी. पाटील) श्री. विष्णू चैतन्य गणपत महाराज मंदिर ट्रस्ट, भांडुप, राष्ट्र सेवा दल, मुंबई आणि निर्मिती उद्धर – पाली यांच्या संयुक्त विद्यमाने खवली, उद्धर , उद्धर -कातकरीपाडा, पाली, जिल्हा रायगड येथील तीन आदिवासी पाड्यांवर आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि रेनकोटचे वाटप कार्यक्रम नुकताच (दि. २५ जून, २०२५रोजी) खवली, उद्धर ,पाली येथे आयोजित केला होता.

ज्येष्ठ कामगार नेते परशुराम कोपरकर यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व रेनकोट उपलब्ध करुन देण्यात आले. यावेळी राष्ट्र सेवा दलाचे विश्वस्त प्रा. जयवंत पाटील यांनी विद्यार्थ्यांना साने गुरुजींच्या गोष्टी सांगितल्या. प्रमुख पाहुणे म्हणून भावेश कोपरकर ह्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व रेनकोट यांचे वाटप करण्यात आले. संस्था प्रत्येक वर्षी आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व रेनकोटचे वाटप करीत असते.

यावर्षी ५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व रेनकोटचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संस्थेच्या कविता पाटील व सुदाम सुतार तसेच सेवादलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सतीश उंडाळकर, प्रशांत गावंड,आदि मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खवली हायस्कूलचे मुख्याध्यापक एम. व्ही. मोरे, उद्धर कातकरी शाळेचे मुख्याध्यापक दीपक शिंदे , उद्धर शाळेचे मुख्याध्यापक विकास चाटे आणि त्यांच्या शिक्षकवृंदानी सहकार्य केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.