
पनवेल, दि.25 (वार्ताहर) ः वरिष्ठ महिला महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्य पद स्पर्धा 2025 आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे संपन्न झाल्या आपल्या रायगड जिल्हा च प्रतिनिधित्व करणारी योगिनी पाटील व पनवेल येथील उन्नती परदेशी यांचं महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग स्पर्धेत उत्तम कामगिरी केली आहे.
कु उन्नती संग्रामसिंह परदेशी हिने 65 किलो वजन गटात सुवर्ण पदक प्राप्त केले. प्राथमिक फेरीत तिने मुंबई उपनगर, उपांत्य फेरीत पुणे जिल्हा आणि अंतिम फेरीत क्रीड़ा प्रबोधिनी अकोला चा एकतर्फी विजय प्राप्त केला व तीची निवड हैदराबाद तेलंगाणा येथे होणार्या राष्ट्रीय ऐलीट वुमन बॉक्सिंग चॅम्पियनशिप साठी झाली आहे. तर 54 गटात कु योगिनी पाटील हिने प्राथमिक फेरीत पुणे शहर, उपांत्य फेरीत मुंबई वर विजय मिळवून अंतिम फेरीत अहिल्यानगर कडुन गुणाने पराभूत झाल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. या दोघी स्पर्धकांनी उत्तम यश मिळविल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

Be First to Comment