

पेण, ता. २४ (वार्ताहर) : शांतिलाल संघवी आय इन्स्टिट्यूट मुंबई व बाफना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबिराच्या आयोजन जैन समाज हॉल येथे करण्यात आले होते.
या शिबिराला जवळपास १७० रुग्णांनी तपासणी करून ६३ रुग्णांना मोतीबिंदू व ३६ रूग्णांची मोतीबिंदू ऑपरेशनसाठी रवानगी करण्यात आली.पेण शहरातील प्रसिद्ध उद्योजक विशाल बाफना यांचे बाफना ज्वेलर्स अनेक वर्षापासून सामाजिक कार्य करत असताना त्यांनी आज
शांतिलाल संघवी आय इन्स्टिट्यूट मुंबई आणि बाफना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुदर्शन मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि संपूर्ण नेत्र रोग निदान शिबिराचे आयोजन केले होते.
यामध्ये संध्याकाळपर्यंत एकूण १७० रुग्णांची तपासणी करण्यात आली असता त्यापैकी ६३ रुग्ण मोतीबिंदूचे आढळून आले असून यातील ३६ रूग्णांना मोतीबिंदू ऑपरेशन साठी शांतिलाल संघवी आय इन्स्टिट्यूट वडाळा, मुंबई येथे नेण्यात आले आहे.यावेळी बाफना ज्वेलर्सच्या लीना बाफना, विशाल बाफना, नितीन पाटील, कृषभ जैन, कृतिक जैन, दीपक शाह, महेंद्र बाफना, रणजित बाफना यासह डॉक्टर्स उपस्थित होते.

Be First to Comment