Press "Enter" to skip to content

अहमदाबादमधील विमान अपघातात उरण मतदार संघातील न्हावा गावातील मैथिली पाटीलचा समावेश


उरण ( अजित पाटील ) गुजरातच्या अहमदाबाद मध्ये झालेल्या विमान अपघातात जे विमानाचे सर्व क्रू मेम्बर्स गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे त्यात उरण मतदार संघातील न्हावा गावातील हवाई सुंदरी मैथिली मोरेश्वर पाटील हिचा समावेश असल्याची दु:खद बातमी हाती आली आहे . कालच न्हावा गावातून ती आपल्या ड्युटीसाठी दुपारच्या सुमारास निघून गेल्याची माहिती न्हावा गावातील माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे यांनी दिली आहे. आई वडील या दोघी बहिणी आणि एकुलता एक भाऊ असलेल्या पंचकोनी कुटुंबातील मैथिली ही सर्वात मोठी मुलगी होती.

न्हावा गावातील टी एस रहेमान शाळेत बारावी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या मैथिलीने अगदी लहानपणापासूनच हवाई सुंदरी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. घरची स्थिती एवढी पण चांगली नव्हती तरीही हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतले आणि दोन वर्षा पूर्वी तीने एव्हिएशन चे शिक्षण पूर्ण करून एअर इंडियात कामाला लागली होती. न्हावा सारख्या ग्रामीण भागात राहून ती नेहमीच अपडाऊन करून आपली नोकरी सांभाळत होती.

कालच ती लंडनला विमानात कर्मचारी म्हणून जायचे आहे म्हणून न्हावा येथून निघून गेली होती. न्हावा गावाचे माजी सरपंच जितेंद्र दामोदर म्हात्रे यांच्या चुलत भाचीची ती मुलगी आहे .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.