भाजपच्या ८१ जिल्हाध्यक्षांची बनावट यादी व्हायरल
पनवेल / प्रतिनिधी.
सोशल मीडियावर “भाजप जिल्हाध्यक्ष २०२५” या नावाने फिरणारी ८१ जिल्हाध्यक्षांची यादी बनावट असून, तिचा पक्षाशी कोणताही संबंध नाही. आतापर्यंत भाजपच्या फक्त ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली असून अजून २२ जिल्हा अध्यक्ष घोषित होणे बाकी आहे. त्यामुळे बनावट यादीवर विश्वास ठेवू नये.असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
पार्टी विथ डिफरन्स अशी बिरूदावली मिरवणाऱ्या भारतीय जनता पार्टीमध्ये अत्यंत शिस्तबद्ध कारभार चालतो. गेल्या दशकभरामध्ये भारतीय जनता पार्टीने मिळविलेल्या नेत्रदीपक यशाच्या पाठीमागे पक्षशिस्त आणि संघटना शक्ती या भक्कम जमेच्या बाजू आहेत. जनता जनार्दनाकडून मिळणाऱ्या मतांच्या जोगव्याच्या अनुषंगाने राजकीय पटलावर भारतीय जनता पार्टीला नामोहरम करणे कठीण जात असल्यामुळे कुठेतरी अनैतिक पद्धतींचा वापर करत पक्ष प्रतिमा आणि संघटन शक्ती खिळखळी करण्याच्या अनुषंगाने विरोधकांच्या अनेक कुरापती सुरू असतात. बनावट जिल्हाध्यक्षांची यादी फिरवून पक्ष कार्यकर्त्यांच्यात संभ्रम निर्माण करून संघटन शक्तीला धक्का देण्याच्या निमित्ताने हा प्रकार सुरू असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातो. परंतु बनावट यादीचा पडदा फार्श करत असतानाच आमचे कार्यकर्ते व हितचिंतक यांची वैचारिक बैठक अत्यंत पक्की असल्यामुळे ते अशा भूलथापांना बळी पडणार नाहीत असा विश्वास देखील आमदार विक्रांत पाटील यांनी जागवला.



Be First to Comment