
पेण, दि. 15 (वार्ताहर) -: रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्याच्या कुरूळ येथील आरसीएफ स्कूल मधील विद्यार्थिनी सानिका संजेश इकर हिला दहावी परिक्षेत 98 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या एसएससी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परिक्षेत अलिबागच्या कुरुळ शाळेतील विद्यार्थिनी सानिका संजेश इकर हिने सायन्सच्या प्रत्येक विषयात 96 ते 97 असे गुणप्राप्त केले असून संस्कृत मध्ये 100 पैकी 100 गुण प्राप्त केले आहे. या सर्व विषयांचे गुण पाहता तिला 98 टक्के गुण प्राप्त होऊन नंबर मिळविला आहे.पहिल्यापासूनच हुशार असणारी सानिका इकर हिने दहावी परिक्षेत चांगले गुण मिळवले असल्याने शाळेच्या वतीने तसेच तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.तिच्या या यशाबद्दल तिने शाळेतील शिक्षक वर्ग तसेच आई- वडील यांच्याकडून लाखमोलाचे मार्गदर्शन मिळाले असल्याचे सांगितले आहे.

Be First to Comment