Press "Enter" to skip to content

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे काम कौतुकास्पद

एमसीए तर्फे जिल्हा क्रिकेट संघटनेला प्रत्येकी ७५ लाख रुपयांचे अनुदान देणार – रोहित पवार

पेण, ता. १२ (वार्ताहर) : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे (एमसीए) राज्यातील प्रत्येक जिल्ह्याकरीता क्रिकेट विकासासाठी ७५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार असून रायगड जिल्ह्यात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी एमसीए सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे तसेच येणाऱ्या काळात जिल्हा क्रिकेट असोसिएशनता अजून भरीव निधी उपलब्ध करून देणार असल्याचे महाराष्ट्र क्रिकेट अससिएशनचे अध्यक्ष तथा आमदार रोहित पवार यांनी पेण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी माजी कॅबिनेट मंत्री व विद्यमान आमदार रवीशेठ पाटील, माजी आमदार अनिकेत तटकरे, पेण नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा प्रितम पाटील, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव संतोष बीब तसेच अपेक्षा कौन्सिल सदस्य राजू काणे, सुशील शेवाळे, अजय देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य जोशी, रायगड क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदीप नाईक, रायगड रॉयल्स संघमालक अलीशा बाहेती, रायगड संपला संघाचे संचालक पराग मोरे, रायगड रॉयल्स पुरुष व महिला संघाचे कर्णधार किरण नवगिरे, तसेब संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी रोहित पवार अधिक म्हणाले की महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धेमुळे राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेल्या गुणवान क्रिकेट पटूना राष्ट्रीय स्तरावर जाण्याची संधी मिळणार असून या स्पर्धेमुळे भविष्यात भारतालाही गुणवान क्रिकेटपटू मिळणार आहेत.सलग तिसऱ्या वर्षी खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेच्या यशात सर्व संघांच्या मालकांचा मोलाचा वाटा आहे. एमपीएल व डब्ल्यूएमपीएल हे केवळ स्पर्धात्मक मंच नसून, एक परिवार आहे.संघमालक, खेळाडू, पदाधिकारी, टीम आणि सपोर्ट स्टाफ यांचे परिश्रम या यशामागे आहेत.तर रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांची सर्व कमिटीचे काम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.तर महाराष्ट्र क्रिकेट संघटना आगामी हंगामात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या धर्तीवर स्वतःची अकादमी सुरु करणार असून, मुख्य अकादमी अजय शिर्के यांच्या नावाने पुण्यातच सुरु करण्यात येईल.त्यानंतर जिल्ह्यात चार विभागीय अकादमी सुरु करण्यात येणार असून यातील एक रत्नागिरीत दापोली येथे झोनल अकेडमी म्हणून सुरु करण्यात येणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.