
पेण , ता. 9 (वार्ताहर) : पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी गेल्या दहा महिन्यांपूर्वी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी केलेल्या कर्तव्यदक्ष अशा कामामुळे त्यांना महासंचालक पदक जाहीर होऊन दि.१ मे रोजी पालकमंत्री यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आल्याने त्यांचे शिवसेना ठाकरे गटाकडून अभिनंदन करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी गेल्या काही महिन्यांपासून पेण मधील असंख्य गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करत येथील गुन्हेगारी जवळपास संपुष्टात आणली आहे.त्यामध्ये भुरटे चोर, पाकीटमार, साखळी चोर, मुलींचे छेडछाड प्रकरण यासह सायबर गुन्ह्यातील विविध प्रकरणात त्यांनी अतिशय चांगले काम करून मध्यंतरी एका युवकाचे प्राण वाचविल्याने त्याचे कुटुंब वाचले आहे. या सर्व गोष्टीं पाहता त्यांना महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक पदक जाहीर करण्यात येऊन त्यांना १ मे रोजी सदरच्या पदकाने पालकमंत्री यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत असताना पेण तालुका शिवसेना ठाकरे गटाकडूनही त्यांचे अभिनंदन करण्यात येऊन त्यांना राधा कृष्णाची प्रतिमा भेट वस्तू म्हणून देण्यात आली.यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिका निवृत्त सहाय्यक अभियंता जल विभाग तथा ज्येष्ठ शिवसैनिक जीवन पाटील, माजी शहर प्रमुख रवींद्र पाटील, काँग्रेस पेण शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गट सचिव स्वरूप घोसाळकर आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Be First to Comment